एक्स्प्लोर
छातीत दुखु लागल्याने ब्रायन लारा मुंबईच्या ग्लोबल रुग्णालयात दाखल
वेस्ट इंडिजचा वेस्ट इंडिजचा विश्वचषकाच्या निमित्तानं सध्या भारतात आहे. स्टार स्पोर्टस वाहिनीवर सध्या तो क्रिकेट एक्स्पर्ट म्हणून काम पाहतोय.
मुंबई : वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. छातीत वेदना होत असल्याने ब्रायन लाराला मुंबईतल्या ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या ग्लोबल रुग्णालयात लारावर उपचार सुरु आहेत.
आज सकाळपासून ब्रायन लाराला वेदना होत होत्या. त्यामुळे तपासणीसाठी लाराला रुग्णालयात आणलं आहे. याआधीही लाराला अशा प्रकारच्या वेदना झाल्या होत्या. तसेच एक सौम्या स्वरुपाचा हृदय विकाराचा झटका येऊन गेला होता.
वेस्ट इंडिजचा वेस्ट इंडिजचा विश्वचषकाच्या निमित्तानं सध्या भारतात आहे. स्टार स्पोर्टस वाहिनीवर सध्या तो क्रिकेट एक्स्पर्ट म्हणून काम पाहतोय.
भारतातल्या या वास्तव्य़ादरम्यान काही दिवसांपूर्वीचं लारानं नुकतीच ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली. यावेळी लारानं जंगल सफारीचा आनंद लुटला. या सफारीदरम्यान लारानं तिथल्या पर्यटकांसोबत छायाचित्रंही काढली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement