एक्स्प्लोर
मुंबईत शिवसेनेच्या माजी नगरसेवकाची भररस्त्यात निर्घृण हत्या
मुंबईतल्या कांदिवलीतील शिवसेनेचे माजी नगरसेवर अशोक सावंत यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. काल (रविवार) रात्री 11 वाजता अशोक सावंत आपल्या घरी जात असताना बाईकवरुन येणाऱ्या काही अज्ञातांनी त्यांच्यावर धारधार शस्त्रांनी हल्ला केला.
![मुंबईत शिवसेनेच्या माजी नगरसेवकाची भररस्त्यात निर्घृण हत्या Former Shiv Sena corporator Ashok Sawant murder in Mumbai latest update मुंबईत शिवसेनेच्या माजी नगरसेवकाची भररस्त्यात निर्घृण हत्या](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/01/08082322/ashok-sawant.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मुंबईतल्या कांदिवलीतील शिवसेनेचे माजी नगरसेवर अशोक सावंत यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. काल (रविवार) रात्री 11 वाजता अशोक सावंत आपल्या घरी जात असताना बाईकवरुन येणाऱ्या काही अज्ञातांनी त्यांच्यावर धारधार शस्त्रांनी हल्ला केला. त्यानंतर सावंत यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं.
अशोक सावंत हे आपल्या घरी जात असताना ही घटना घडली. घरापासून अवघ्या काही अंतरावरच सावंत यांच्यावर हल्ला करण्यात आला.
दरम्यान, हत्येचं नेमकं कारण काय याचा पोलिस तपास करत असून या ठिकाणचं एखादं सीसीटीव्ही फुटेज मिळवण्याचाही प्रयत्न करत आहेत. भररस्त्यात सावंत यांची हत्या करण्यात आल्यानं संपूर्ण परिसरात सध्या तणावाचं वातावरण आहे.
दरम्यान, पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस हल्लेखोरांचा तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
क्राईम
भारत
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)