एक्स्प्लोर

विविध मागण्यांसाठी आदिवासींचा मोर्चा मुंबईत धडकला

'जनजाती अस्मितेचा हुंकार : वणवा' या नावाने हा मोर्चा निघाला. शासनानं जर वेळेत मागण्या मान्य केल्या नाहीत तर मोठे आंदोलन उभारण्याचा इशाराही वनवासी कल्याण आश्रमाकडून देण्यात आला आहे.

मुंबई: वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीने आदिवासींचा मोर्चा आज जिजामाता उद्यान ते आझाद मैदानापर्यंत काढण्यात आला. या मोर्चात हजारोंच्या संख्येनं आदिवासी बांधव सहभागी झाले. बोगस आदिवासी हटाव हा नारा या मोर्चानं दिला. त्यासोबतच आदिवासींसाठी असणाऱ्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी, यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. 'जनजाती अस्मितेचा हुंकार : वणवा' या नावाने हा मोर्चा निघाला. शासनानं जर वेळेत मागण्या मान्य केल्या नाहीत तर मोठे आंदोलन उभारण्याचा इशाराही वनवासी कल्याण आश्रमाकडून देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील जनजाती बांधवांच्या प्रलंबित मागण्यांसाठी तसेच आदिवासी म्हणून बोगस नोंदणी करणार्‍यांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला. हितरक्षा प्रकल्पाच्या माध्यमातून जनजाती समाजाचे प्रश्‍न सोडवण्याचा प्रयत्न वनवासी कल्याण आश्रम करत आहे. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून, या समाजाच्या प्रश्‍नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. वनवासी बांधवांच्या मागण्यांसाठी वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीने आज मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. भायखळा येथून सुरू झालेल्या या मोर्चाची सीएसएमटी येथील आझाद मैदान येथे सांगता झाली. यावेळी झालेल्या सभेत राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा उपस्थित होते. वनवासींच्या मागण्या मान्य करून त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे  सावरा यांनी मुख्यमंत्र्यांच्या वतीने स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाने दि. 6 जुलै 2017 रोजी दिलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीत तांत्रिक अडचणी येत असून डिसेंबर 2019 पर्यंत ती पूर्ण केली जाणार असल्याचेही ते म्हणाले. जातपडताळणी समिती आयुक्त व.सु.पाटील यांच्या बोगस जातप्रमाणपत्र प्रकरणाची चौकशी सुरू असून संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. काय आहेत आदिवासींच्या मागण्या राज्यातील आदिवासी म्हणून बोगस नोंदणी करणार्‍यांची चौकशी करणे, वनहक्क कायद्यानुसार सामुहिक वनाधिकार बहाल करण्याच्या प्रक्रियेस गती देणे, आदिम जमातींचे विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी तातडीने हालचाल करणे, पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे, जनजाती समाजाच्या विविध परंपरांचे डॉक्युमेंटेशन करणे, जनजाती समाजातील लोककलांचे संरक्षण व्हावे यासाठी जनजाती अध्ययन आणि संशोधन केंद्र स्थापन करणे,जनजाती क्रांतिकारकांची स्मारके उभारणे, जनजातींचे विस्थापन रोखणे, आदिवासींच्या योजना राबविण्यात दिरंगाई करणार्‍यावर कारवाई करणे,जनजाती विद्यार्थ्यांचे भत्ते, शिष्यवृत्ती, शुल्क याबाबतचे प्रश्‍न तातडीने निकाली काढणे अशा मागण्या वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीने करण्यात आल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget