एक्स्प्लोर
Advertisement
Flipkart Sale: आयफोन आणि गुगलच्या स्मार्टफोनवर बंपर ऑफर
मुंबई: देशात जीएसटी लागू होण्यापूर्वी अनेक ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांनी सेल सुरु केले आहेत. अमेझॉन पाठोपाठ आता फ्लिपकार्टनंही आपल्या यूजर्ससाठी #OwnYourDreamPhone सेल आणला आहे. हा सेल 22 जून ते 24 जूनपर्यंत असणार आहे. या सेलमध्ये आकर्षक सूट, एक्सचेंज ऑफर आणि नो कॉस्टट ईएमआय ऑफरही आहेत.
या सेलमध्ये सर्व आयफोन व्हेरिएंटवर बरीच सूट देण्यात आली आहे. आयफोन 7 प्लस 128 जीबीवर तब्बल 22,000 रु. सूट देण्यात आली आहे. 82,000 रु. किंमतीचा हा फोन 59,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. तर आयफोन 7 32 जीबीवर 17,000 रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे.
या सेलमध्ये आयफोन 6 चे 16 जीबी आणि 32 जीबी व्हेरिएंट देखील विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. यामध्ये 32 जीबी मॉडेलची किंमत 25,999 रुपये असू शकते. तर आयफोन 6 प्लसची किंमत 40,999 रुपये असणार आहे. आयफोन 5S 14,999 रुपयात खरेदी करता येणार आहे.
आयफोनशिवाय गुगल पिक्सलवर देखील घसघशीत सूट देण्यात आली आहे. यामध्ये कंपनी 3 हजारपेक्षा जास्त डिस्काउंट देत आहे. याच सेलमध्ये मोटो Z वर 10,000 रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
आरोग्य
Advertisement