एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पदवीच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी उद्या पहिली मेरिट लिस्ट
दुसरी आणि तिसरी मेरिट लिस्ट नियोजित वेळापत्रकानुसारच लावण्यात येईल, अशी माहिती मुंबई विद्यापीठाने दिली.
मुंबई : पदवीच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी पहिली मेरिट लिस्ट उद्या (19 जून) लावण्यात येणार आहे. तर कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया ही 20 जून ते 22 जूनपर्यंत असेल.
दुसरी आणि तिसरी मेरिट लिस्ट नियोजित वेळापत्रकानुसारच लावण्यात येईल, अशी माहिती मुंबई विद्यापीठाने दिली.
मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थामध्ये पदवीच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाने प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया 1 जून 2018 पासून सुरु केली होती.
या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीसाठी एकूण दोन लाख 75 हजार 390 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. या विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांसाठी आठ लाख 54 हजार 949 अर्ज केले आहेत.
वाणिज्य शाखेतील परंपरागत अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांनी सर्वाधिक अर्ज केले आहेत. त्यापाठोपाठ विज्ञान शाखा आणि कला शाखेतील अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement