एक्स्प्लोर
शिवसेना नगरसेवकाच्या मुलाचा वाढदिवसाला हवेत गोळीबार, व्हिडीओ व्हायरल
ठाण्यातील नगरसेवक संजय पांडे आणि त्यांचा मुलगा निल पांडे यांनी खुलासा केला आहे. केवळ वाढदिवसानिमित्त गेलो होतो, दिवाळीच्या दिवसातील खेळण्याची बंदूक होती. तसेच मी कायद्याचा अभ्यास करणारा विद्यार्थी आहे, कायदा का हातात घेऊ, असे निलने सांगितले आहे.

ठाणे : ठाण्यातील गांधीनगर प्रभाग क्रमांक 5 मधील सेनेचे नगरसेवक संजय पांडे यांचा मुलगा निल पांडे याने दोन दिवसांपूर्वी त्याच्या वाढदिवसानिमित्त हवेत गोळीबार करत असतानाचा व्हिडिओ वायरल झाला आहे. दोन दिवसांपूर्वी लोणावळा येथे वाढदिवसाची पार्टी करत असताना निलने हवेत गोळीबार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नगरसेवकाच्या मुलाने अशा प्रकारे फायरिंग केल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर ठाण्यातील नगरसेवक संजय पांडे आणि त्यांचा मुलगा निल पांडे यांनी खुलासा केला आहे. केवळ वाढदिवसानिमित्त गेलो होतो, दिवाळीच्या दिवसातील खेळण्याची बंदूक होती. तसेच मी कायद्याचा अभ्यास करणारा विद्यार्थी आहे, कायदा का हातात घेऊ, असे निलने सांगितले आहे. तर गेल्या 10 वर्ष नगरसेवक असून व्यावसायिक आहे. त्यामुळे मला बदनामी करण्याचा कट आहे माझ्याकडे वैयक्तिक पिस्टल नसल्याचा खुलासा देखील पांडे यांनी केला आहे.
दरम्यान, या व्हिडीओची दखल आता पोलीस घेतील का? पोलिसांच्या याच भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, तसेच निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या चिरंजीवांनीच असा वाढदिवस साजरा करण कितपत योग्य आहे? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
