भिवंडीत पुन्हा अग्नितांडव, खुल्या मैदानात थाटलेल्या मॅरेज हॉलला भीषण आग; अनेक वाहनांचा कोळसा
Bhiwandi Fire Update : शहरातील खंडूपाडा परिसरात असलेल्या अंसारी मॅरेज हॉल मध्ये भीषण आग लागल्याची घटना रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. या आगीत 20 ते 25 दुचाकी वाहने जळाली
Bhiwandi Fire Update : शहरातील खंडूपाडा परिसरात असलेल्या अंसारी मॅरेज हॉल मध्ये भीषण आग लागल्याची घटना रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. या आगीत 20 ते 25 दुचाकी वाहने जळाली असून अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनी दोन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळाले आहे. या मॅरेज हॉलमध्ये लग्नसमारंभ सुरु होता. सुदैवाने आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे.
विवाह सोहळ्यादरम्यान वाहन पार्किंगच्या ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेत फटाके लावले होते. फटाक्यांची आतिषबाजी करतांना मंडपाला आग लागली. त्यानंतर हळूहळू ही आग पसरून वाहन पार्किंग ठिकाणी असलेल्या सुमारे 20 ते 25 दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले असून स्थानिक पोलीस ठाण्यात या आगीची नोंद करण्यात आली आहे.
Bhiwandi Fire : भिवंडीत भंगाराचं दुकान आगीत जळून खाक, भिवंडीतील आगीच्या घटना कधी थांबणार?
भिवंडीत मोकळ्या जागेत अनेक व्यावसायिकांनी अशा प्रकारे मॅरेज हॉल थाटले आहेत. मात्र सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याने भविष्यात जीवितहानी होण्याची मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून मनपा प्रशासन त्याकडे लक्ष देणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
संबंधित बातम्या
Bhiwandi Fire | भिवंडीत वळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत गोदामाला मोठी आग
Bhiwandi Fire | कृष्णानगर परिसरातील इम्पायर डाइंगला भीषण आग
Bhiwandi Fire | भिवंडीत पॉवर हाऊसलगतच्या शौचालयाला आग, पॉवर हाऊसपर्यंत आग न पोहोचल्याने अनर्थ टळला