एक्स्प्लोर

अर्थमंत्री मुनगंटीवारांकडून उद्धव ठाकरेंना जीएसटीवर प्रेझेंटशन!

मुंबई: अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आज (सोमवार) सकाळी 11.30 वाजता ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना जीएसटीवर एक प्रेझेंटेशन देणार असल्याचं वृत्त समजतं आहे. अर्थमंत्री मुनगंटीवार आणि अर्थ खात्यातील अधिकारी उद्धव ठाकरेंना जीएसटीवर प्रेझेंटेशन देणार आहेत. जीएसटीच्या मुद्द्यावर सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न विरोधकांनी शिवसेनेच्या साथीनं केला होता. त्यामुळे विशेष अधिवेशनात शिवसेनेनं अडचणीत भाजपला आणू नये यासाठी आतापासूनच भाजपनं कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी जीएसटीबाबत आपलं मत व्यक्त केलं होतं. ‘जर लाचार होऊन महापालिकेला राज्य आणि केंद्र सरकारच्या दरबारी जाण्याची वेळ येणार असेल तर शिवसेनेला विचार करावा लागेल. सुरूवातीपासून आमची हिच मागणी आहे की महापालिका ही अबाधित राहिली पाहिजे. भिकेचा कटोरा घेऊन सरकारच्या दारी उभं रहावं लागणार असेल, तर शिवसेनेला पुनर्विचार करावा लागेल.’ असा इशारा उद्धव ठाकरेंनी भाजपला दिला होता. या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून भाजप शिवसेनेचं मन वळविण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी एक खास प्रेझेंटेशन तयार करण्यात आलं असून अर्थ खात्यातील संबंधित अधिकारी हे प्रेझेंटेशन देणार आहेत. दरम्यान, यावेळी शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, दिवाकर रावते, दीपक केसरकर हे उपस्थित राहणार आहेत. तसेच सुनील प्रभू हे देखील या बैठकीला हजेरी लावणार आहेत. GST विधेयक अधिवेशन 20, 21, 22 मे रोजी! GST विधेयक अधिवेशन 17 मे ऐवजी 20, 21, 22 मे रोजी होणार आहे. 18 आणि 19 मे रोजी श्रीनगर इथं अर्थमंत्र्यांनी GST कौन्सिलची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीला अर्थमंत्र्यांना उपस्थित राहणं गरजेचं आहे. त्यामुळे जीएसटीसाठी बोलवण्यात आलेलं अधिवशेन पुढे ढकलण्यात आलं होतं. संबंधित बातम्या: ‘निवडणुकीच्या तयारीला लागा’, उद्धव ठाकरेंचे शिवसेना आमदारांना आदेश यूपीत योगी सरकार, महाराष्ट्रात निरुपयोगी सरकार : उद्धव ठाकरे पाकड्यांशी 'मन की नाही तर गन की बात' करा : उद्धव ठाकरे GST विधेयक अधिवेशन 20, 21, 22 मे रोजी !
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacker Update : सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचं वरळीतील कोळीवाड्यात वास्तव्य, आरोपीचे शेजारी काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 19 January 2024Anandache Paan ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाकेंशी समकाल आणि समांतर पुस्तकांच्या निमित्त खास संवादABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
IPS Shivdeep Lande : बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
Embed widget