एक्स्प्लोर
CCTV : मुंबईतील कांदिवलीत पेट्रोल पंपावर 8 जणांकडून तरुणाला बेदम मारहाण

कांदिवली (मुंबई) : कांदिवलीच्या महावीर नगर परिसरातल्या पेट्रोल पंपावरची हाणामारी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 22 जुलैच्या रात्री 3 वाजता ही घटना घडली आहे.
पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या तरुणांमध्ये सुरुवातीला शाब्दिक वाद सुरु झाला. हा वाद विकोपाला गेला आणि थेट पंपावरच्या पाईप घेऊन मारामारी सुरु झाली. यामध्ये 8 जणांचा ग्रुप एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे.
यावेळी पीडित तरुण आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, तरीही तरुणांच्या टोळ्यानं तरुणाला बेदम मारहाण केली. यावेळी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं.
पाहा व्हिडीओ-
आणखी वाचा
Advertisement
Advertisement




















