एक्स्प्लोर
खेळण्यातल्या बंदुकीचा वाद जीवावर, रेल्वेखाली येऊन एकाचा मृत्यू
ठाणे : दारुच्या धुंदीत झालेलं भांडण एका व्यक्तीच्या जीवावर बेतलं आहे. ठाणे रेल्वे स्टेशनवर घडलेल्या या थरारक अपघाताची दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहेत.
राहुल मुसळे असं या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे. राहुल आणि त्याच्या दोन साथीदारांचा स्टेशनबाहेरील खेळणे विक्रेत्याशी वाद झाला. आसनगावचे रहिवासी असलेल्या राहुल मुसळे यांनी खेळण्याची बंदूक घेतली आणि पैस न देताच ते स्टेशनच्या दिशेनं निघाले.
जेव्हा विक्रेता आपल्या पाठीमागे येत आहे, हे त्यांच्या ध्यानात आलं, तेव्हा मुसळे थेट रेल्वे रुळांवर उतरले, तर साथीदारांनी ब्रिजच्या दिशेने पोबारा केला. मुसळे रेल्वे रुळावर उतरल्यावर समोरुन ट्रेन येत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. मात्र त्यांनी पुन्हा वर येईपर्यंत ट्रेनने त्यांना धडक दिली होती.
ट्रेनच्या धडकेतच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 27 ऑक्टोबरला रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. मुसळेंसोबत असलेल्या साथीदारांना त्यांच्या अपघाताची कल्पनाही नव्हती. दुसऱ्या दिवशी त्यांना मुसळेंचा मृत्यू झाल्याचं वृत्त पोलिसांकडून समजलं.
पाहा व्हिडिओ : (या व्हिडिओतील दृश्यं तुम्हाला विचलित करु शकतात)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
महाराष्ट्र
Advertisement