एक्स्प्लोर
मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील उपचार महागणार!
मुंबई महापालिकेच्या सभागृहात शुल्कवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर ही शुल्कवाढ महापालिका रुग्णालयांत लागू होईल. मात्र सीटीस्कॅन आणि एमआरआय सारख्या सेवा या शुल्कवाढीतून वगळण्यात आल्या आहेत.
![मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील उपचार महागणार! fee hike for patients in bmc hospitals latest marathi news updates मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील उपचार महागणार!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/01/17175656/mumbai-hospitals.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांची रुग्णसेवा आता महागणार आहे. महापालिकेच्या रुग्णालयातील उपचार मुंबई बाहेरील रुग्णांसाठी तब्बल 30 टक्क्यांनी महाग होणार आहे, तर मुंबईतील नागरीकांसाठी 20 टक्के शुल्क वाढ करण्यात आली आहे.
महापालिकेनं जरी आपल्या रुग्णालयात शुल्कवाढ केली असली तरीही जेष्ठ नागरीकांना यापुढेही महापालिका रुग्णालयात मोफत उपचार मिळणार आहे. मुंबई महापालिकेच्या सभागृहात शुल्कवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर ही शुल्कवाढ महापालिका रुग्णालयांत लागू होईल. मात्र सीटीस्कॅन आणि एमआरआय सारख्या सेवा या शुल्कवाढीतून वगळण्यात आल्या आहेत.
मुंबईतील पालिका रुग्णालयात मुंबईकरांसोबतच मुंबई बाहेरील रुग्णही मोठ्या संख्येने उपचार घेतात. पालिकेच्या केईएम, नायर आणि लोकमान्य टिळक या तीन रुग्णालयावर पालिका वर्षाला 600 ते 700 कोटी रुपये खर्च करते. त्यापैकी दहा टक्केही उत्पन्न पालिकेला मिळत नाहीत. तशीच अवस्था इतर रुग्णालयांची आहे. म्हणून पालिका रुग्णालयातील सेवा अद्ययावत करण्यासाठी शुल्कवाढीचा निर्णय घेतला जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
पुणे
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)