एक्स्प्लोर

Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'

Tukaram Mundhe: काही व्यावसायिक पेस्ट कंट्रोल न करताच केवळ दाखवण्यासाठी खोटे किंवा जुने प्रमाणपत्र गोळा करतात. अशा फसवणुकीवर थेट कडक कारवाईचा इशारा तुकारा मुंढे यांनी दिला आहे.

Tukaram Mundhe: अन्न आणि औषध प्रशासन विभागातील आयुक्तपदाची तुकाराम मुंढे यांनी धुरा हाती घेतल्यानंतर राज्यात भेसळखोरांचे आणि यामधील अभेद्य साखळीचे धाबे दणाणले आहेत. आता नुसती पत्रकबाजी करणाऱ्यांना गर्भित इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. हॉटेल रेस्टॉरंटमध्ये पेस्ट कंट्रोल केलं असं सर्टीफिकेट दाखवतात. मात्र, प्रत्यक्षात पेस्ट कन्ट्रोल काही हॉटेलमध्ये केलं नव्हतं. त्यांचे लायसन्स रद्द करण्याचे काम आम्ही केलं असल्याचे मुंढे यांनी सांगितलं. त्यामुळे कागदी घोडे नाचवणाऱ्यांना कारवाईचा दणका दिला आहे.

पेस्ट कंट्रोल रेग्युलर बेसिसवर घेणं अपेक्षित

तुकाराम मुंढे म्हणाले, महाराष्ट्र शासनाने दुध व दुग्धजन्य पदार्थाच्या संपूर्ण पुरवठा साखळीत अन्न सुरक्षा व गुणवत्ता मानकांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यव्यापी सर्वकष अनुपालन आदेश जारी केला आहे. हा आदेश दध संकलन शीतकरण प्रक्रिया, पॅकेजिंग, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्री या सर्व  टप्प्यावर लागू असेल. या आदेशाचा उद्देश केवळ भेसळ रोखणे नसून सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण वाढ करणे, प्रामाणिक दुध व्यवसायांना प्रोत्साहन देणे आणि राज्यात आधुनिक अन्न सुरक्षा संस्कृती विकसित करणे असल्याचे म्हटले आहे. पेस्ट कंट्रोलबाबत बोलताना ते म्हणाले की, ते कीटक नियंत्रण (पेस्ट कंट्रोल) जे आहे, त्या बाबतीत त्यांचं संस्थेबरोबर टायअप पाहिजे, जे रजिस्टर्ड आहेत त्यांच्याकडून ते पेस्ट कंट्रोल रेग्युलर बेसिसवर घेणं अपेक्षित आहे, तो वैध करार असला पाहिजे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या उंदीर, कीटक, माश्यांचा प्रादुर्भाव याच्याबद्दल शून्य सहनशीलता पॉलिसी आहे, त्याप्रमाणे अंमलबजावणी झाली पाहिजे. 

त्यांनी पुढे सांगितले की, गेल्या वेळी मी हॉटेल, रेस्टॉरंट आणि ईटरीच्या बाबतीत हे एक सांगितलं होतं की पेस्ट कंट्रोल व्यवस्थित पाहिजे. बऱ्याच लोकांनी सुधारणा नक्की केली आहे. परंतु, काही ठिकाणी फक्त ते सर्टिफिकेट दाखवलं गेलं आहे की 'आम्ही करून घेतलेलं आहे' म्हणून; पण ते (प्रत्यक्षात) केलं जात नाही. यांच्यावरती आम्ही फक्त सस्पेंशन नव्हे, तर रजिस्ट्रेशन कॅन्सलचीकारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल पण करणार आहोत. तर हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की फसवण्यासाठी करू नका, हे नियमांचे पालनसाठी आहे धमकावण्यासाठी नाही. कारण याचा पूर्णपणे इम्पॅक्ट हा आपल्या नागरिकांवरती, प्रत्येकावरती होतो. कारण ते फूड कंज्युम केलं जातं आणि त्याचे परिणाम होतात, असे ते म्हणाले. 

कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाही

पेस्ट कंट्रोल कोणत्याही अनधिकृत व्यक्तीकडून करून चालणार नाही. ते शासनाकडे नोंदणीकृत (Registered) असलेल्या एजन्सीकडूनच करून घ्यावे लागेल आणि त्याचा कायदेशीर वैध करार (Valid Agreement) आस्थापनेकडे असणे बंधनकारक आहे. प्रक्रिया केंद्र, डेअरी किंवा हॉटेलच्या आवारात एकही उंदीर, कीटक अथवा माशी आढळल्यास कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. काही व्यावसायिक पेस्ट कंट्रोल न करताच केवळ दाखवण्यासाठी खोटे किंवा जुने प्रमाणपत्र गोळा करतात. अशा फसवणुकीवर थेट कडक कारवाईचा इशारा दिला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
भाड्याने वाहन लावून देण्याचं आश्वासन, महिलेकडून तब्बल 33 लाखांची फसवणूक, दिंडोशी पोलिसांची मोठी कारवाई, आरोपीला मध्य प्रदेशातून अटक 
भाड्याने वाहन लावून देण्याचं आश्वासन, महिलेकडून तब्बल 33 लाखांची फसवणूक, दिंडोशी पोलिसांची मोठी कारवाई, आरोपीला मध्य प्रदेशातून अटक 
Advertisement

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget