एक्स्प्लोर

शेतकऱ्यांचा आझाद मैदानात ठिय्या, आंदोलकांवर उपाशी राहण्याची वेळ

वनाधिकार कायदा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी, दुष्काळ निवारण, आदिवासी समस्या आणि कर्जमाफी अशा विविध मुद्द्यांवर सरकारने दिलेली आश्वासनं पूर्ण न झाल्याने हा मोर्चा काढण्यात आला आहे.

मुंबई : विविध मागण्यांसाठी शेतकरी आणि आदिवासींनी काढलेला 'उलगुलान मोर्चा' मुंबईतील आझाद मैदानात दाखल झाला आहे. आंदोलकांचा आझाद मैदानात ठिय्या सुरु आहे. मात्र आंदोलक सकाळपासून उपाशी आहेत. आंदोलनस्थळी जेवणाची व्यवस्था केलेली नाही. तर काहींनी मागण्या मान्य होईपर्यंत जेवण न करण्याचा निश्चय केला आहे. दरम्यान आंदोलनाचं नेतृत्त्व करणाऱ्या प्रतिभा शिंदे यांच्यासह 18 जणांचं शिष्टमंडळ दुपारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपल्या मागण्या त्यांच्यासमोर मांडणार आहेत. या शिष्टमंडळात प्रतिभा शिंदे, बी जी कोळसे-पाटील, झिलाबाई, पारोमिता गोसावी, भरत बारेला, पन्नालाल मावळे, सचिन धांडे, राजेंद्र गायकवाड, केशव वाघ, दिपू पवार, बुधा बारेला, काथा वसावे, सुकलाल तायडे, यशवंत पाडवी, फिरोज मिस्त्रीबोरवाल, एकनाथ शिंदे, ज्योती बडेकर, धनंजय शिंदे यांचा समावेश आहे. दरम्यान, आंदोलकांनी बुधवारी सोमय्या मैदानात मुक्काम केला. त्यानंतर सरकारविरोधी घोषणा देत हे शेतकरी सकाळी आज पहाटे साडेचारच्या सुमारास आझाद मैदानाच्या दिशेने रवाना झाले. या विराट मोर्चात महिला, पुरुषांसह वृद्ध आणि लहान मुलंही सहभागी झाले आहेत. वनाधिकार कायदा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी, दुष्काळ निवारण, आदिवासी समस्या आणि कर्जमाफी अशा विविध मुद्द्यांवर सरकारने दिलेली आश्वासनं पूर्ण न झाल्याने हा मोर्चा काढण्यात आला आहे. "सरकारने आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही ठिय्या आंदोलन करु आणि गरज पडल्यास जेलभरो आंदोलनही करु," असा इशारा प्रतिभा शिंदे यांनी दिला आहे. शेतकऱ्यांचा आझाद मैदानात ठिय्या, आंदोलकांवर उपाशी राहण्याची वेळ आझाद मैदानात ठिय्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी मोर्चात सहभागी झाले आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आझाद मैदानावरुन उठणार नाही, अशी निर्धार त्यांनी केला आहे. शेतकऱ्यांची प्रकृती बिघडली या मोर्चातील सुमारे 400 आंदोलकांची तब्येत बिघडली आहे. सरकारकडून त्यांना कोणतीही मदत मिळालेली नाही. काही संस्था त्यांच्या मदतीसाठी पुढे आल्या आहेत. खाण्यापिण्यासह औषधं त्यांना पुरवली जात आहे. ठाण्यातून मुंबईच्या दिशेने अनवाणी येणाऱ्या या शेतकऱ्यांच्या पायांना जखमा झाल्या आहे. तर काही जण तापामुळे आजारी पडले आहेत. मागण्यांवर तोडगा काढू : महाजन दरम्यान, मागण्यांवर आम्ही लवकरात लवकर तोडगा काढू, असं आश्वासन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलकांना दिलं आहे. गिरीश महाजनांनी रात्री उशिरा सोमय्या मैदानावर जाऊन आंदोलकांची भेट घेतली. "आमच्या सरकारकडून लोकांच्या अपेक्षा आहेत, म्हणून विविध संघटना आणि घटकांचे मोर्चे निघत आहेत," असा दावा महाजनांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या

शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Tukaram Mundhe FDA : तुमच्याकडे तलवार आहे, पण त्याने डास मारता, अधिकारांचं प्रदर्शन करता; हॉटेलवरील धाडीवरून कोर्टाने FDAला फटकारलं
तुमच्याकडे तलवार आहे, पण त्याने डास मारता, अधिकारांचं प्रदर्शन करता; हॉटेलवरील धाडीवरून कोर्टाने FDAला फटकारलं
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
Embed widget