एक्स्प्लोर
लोकल बदलण्याची कटकट मिटली, गोरेगाव ते पनवेल थेट प्रवास!
हार्बर मार्गाचा अंधेरी ते गोरेगावपर्यंत विस्तार करण्यात आला आहे.

मुंबई: आजपासून गोरेगाववरुन लोकल न बदलता थेट तुम्हाला पनवेलपर्यंत जाता येणार आहे. हार्बर मार्गाचा अंधेरी ते गोरेगावपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. आज त्याचं लोकापर्ण होणार आहे.
सध्या हार्बर मार्ग सीएसएमटी ते वाशी, पनवेल आणि अंधेरीपर्यंत आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरील लोकल अंधेरीपर्यंतच धावत होत्या. मात्र हा मार्ग गोरेगावपर्यंत वाढवण्याची मागणी होत होती. ती अखेर मान्य झाली असून, आजपासून प्रत्यक्षात उतरली आहे.
हार्बर मार्गाचा गोरेगावपर्यंत विस्तार झाल्यामुळे, पश्चिम उपनगरातील प्रवाशांना आता थेट पनवेलला जाणं सोपं होणार आहे. गोरेगाव, राम मंदिर रोड, जोगेश्वरी स्थानकांवरील प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.
सध्या सीएसएमटी ते अंधेरी मार्गावर 91 फेऱ्या चालवल्या जात आहेत. हार्बर मार्गावर यापूर्वी अंधेरीपुढे कोणतीही मार्गिका उपलब्ध नव्हती. सध्या अंधेरीहून वडाळामार्गे लोकल पनवेलपर्यंत जाते.
सध्या सुरुवातीला हार्बर मार्गावरुन गोरेगावपर्यंत 49 लोकल फेऱ्या सोडण्यात येणार आहेत.
संबंधित बातम्या
गोरेगावहून आता थेट पनवेल गाठा, लवकरच लोकल सुरु
आणखी वाचा
Advertisement
Advertisement


















