एक्स्प्लोर
मुंब्य्रात भंगाराच्या दुकानातून स्फोटकांचा साठा जप्त, तिघे अटकेत
मुंब्य्रातील डायघरमध्ये भंगाराच्या दुकानात स्फोटकांचा मोठा साठा सापडला आहे.
मुंब्रा (ठाणे) : मुंब्य्रातील डायघरमध्ये भंगाराच्या दुकानात स्फोटकांचा मोठा साठा सापडला आहे. ठाणे पोलिसांनी केलेल्य़ा कारवाईत 3 जणांना अटकही करण्यात आली आहे. 10 किलो अमोनिअम नायट्रेट, 9 डिटोनेटर्सच्या कांड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
भंगार दुकानाचे मालक इस्माईल शेख यांचा काटा काढण्यासाठी महिंसा गणूर, शहा आलम मेहमूद शेख आणि आरिफ नवाब अली खान यांनी कट रचला होता. ईस्माईल शेख आणि तिन्ही आरोपींमध्ये पैशाचा वाद होता. यासाठी तिघांनीही डोंबिवलीवरून स्फोटकं आणून इस्माईल शेख यांच्या भंगाराच्या दुकानात ठेवले.
भंगाराच्या दुकानात स्फोटकं ठेवल्यानंतर आरोपी शहा आलम मेहमूद शेख यांनं आरपीएफला याबाबत माहिती दिली आणि पोलिसांनी कारवाई केली. दरम्यान, पोलिसांनी सखोल चौकशी करुन तिन्ही आरोपींना अटक केली. या कटामागे घातपात घडवण्याचा प्लॅन होता का? याचाही पोलीस तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement