एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कितीही आगी लावल्या तरी जंगल निर्माण होणारच : श्रीकांत शिंदे
अंबरनाथमध्ये वीस हजार झाडांना एका रात्रीत आग लावून नष्ट करण्यात आल्यानंतर स्वतः खासदार श्रीकांत शिंदेंनी घटनास्थळाची पाहाणी केली. 'कुणीही कितीही आगी लावल्या तरी जंगल निर्माण होणारच.’ असा विश्वास श्रीकांत शिंदेनीं व्यक्त केला आहे.
अंबरनाथ : अंबरनाथमध्ये वीस हजार झाडांना एका रात्रीत आग लावून नष्ट करण्यात आल्यानंतर स्वतः खासदार श्रीकांत शिंदेंनी घटनास्थळाची पाहाणी केली. 'कुणीही कितीही आगी लावल्या तरी जंगल निर्माण होणारच.’ असा विश्वास श्रीकांत शिंदेनीं व्यक्त केला आहे.
मांगळूर गावालगतच्या ८४ एकर परिसरात वनजमिनीवर ही वृक्षलागवड करण्यात आली होती. 3 टेकड्यांवर मानवनिर्मित जंगल तयार करण्याचा हा प्रयत्न होता. मात्र, इथल्या झाडांना काही समाजकंटकांनी आग लावली.
दरम्यान, याठिकाणी आपण पुन्हा नव्यानं वृक्ष लागवड करणार असल्याचं श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले. तर ज्या २० हजार झाडांना या आगीची झळ बसली, त्यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न सुरु असल्याची माहिती उपवनाधिकारी डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली. एबीपी माझा'ने जळालेल्या तीन टेकड्यांची ड्रोनने दृश्य टिपली असून यात झाडांचं मोठं नुकसान झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
या संपूर्ण प्रकरणी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली आहे.
संबंधित बातम्या :
खासदार श्रीकांत शिंदेंनी लावलेली 20 हजार झाडं जाळली
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
करमणूक
निवडणूक
Advertisement