एक्स्प्लोर

मराठा आरक्षणाबाबत वैधानिक कार्यवाहीसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन

शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, सार्वजनिक उपक्रम बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, सहकार मंत्री सुभाष देशमुख, जलसंधारण मंत्री राम शिंदे, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा हे या उपसमितीचे सदस्य आहेत. तर सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सह सदस्य आहेत.

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाच्या शिफारशींवर वैधानिक कार्यवाही करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केली आहे. मंत्रिमंडळ उपसमितीबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, सार्वजनिक उपक्रम बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, सहकार मंत्री सुभाष देशमुख, जलसंधारण मंत्री राम शिंदे, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा हे या उपसमितीचे सदस्य आहेत. तर सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सह सदस्य आहेत. मात्र, 1 तारखेला सेलिब्रेशन करा असे मुख्यमंत्री म्हणाले होते.  त्यामुळे आठ दिवस सरकारच्या हातात असून आज समितीचे गठण झाले असल्याने आठ दिवस सरकारच्या हातात आहेत. त्यातील आलेल्या सुट्ट्या पाहता खरंच एक तारखेपर्यंत कारवाई पूर्ण होईल का? असा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे. मागासवर्ग आयोगाचा अहवाल गेल्या 18 तारखेला झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात आला होता , मंत्रीमंडळानं अहवालाच्या खंड 3 मधल्या शिफारशी पूर्णतः स्वीकारून उपसमिती स्थापन करायला मान्यता दिली होती. मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय अंतिम असेल आणि आवश्यक ती वैधानिक कार्यवाही करण्यात येईल.  यासंदर्भातला प्रस्ताव पुन्हा मंत्रिमंडळासमोर सादर करण्याची आवश्यकता भासणार नाही. विचारविनिमय करण्यासाठी गरजेनुसार तज्ञ, विधिज्ञ आणि संबंधित अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्याचे अधिकार या उपसमितीला देण्यात आले आहेत. उपसमिती आता करताय तर पाच दिवसांत मराठा आरक्षण कसे देणार ? धनंजय मुंडेंचा सवाल मराठा आरक्षणाबाबत मंत्रीमंडळाची उपसमिती स्थापन करण्याचा शासन आदेश आज गुरूवार दि.22 नोव्हेंबर, 2018 रोजी सायंकाळी शासनाने काढला. उद्या पासून 3 दिवस शासकीय सुट्या आहेत, आणि अधिवेशनाचे आता केवळ 5 दिवस शिल्लक आहेत. या 5 दिवसात हि समिती तज्ञांना, विधिज्ञांना केंव्हा आमंत्रित करणार ? अभ्यास करून सर्व वैधानिक कार्यवाही कधी पुर्ण करणार ? आणि कायदा करून  1 डिसेंबरच्या आत आरक्षणाचा निर्णय केंव्हा घेणार ? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.   मुख्यमंत्र्यांची 1 डिसेंबरला जल्लोष करण्याची घोषणा त्यामुळे फसवणूकच ठरेल की काय ? अशी भिती ही मुंडे यांनी व्यक्त केली आहे. राज्य मागास आयोगाकडून मराठा आरक्षणाबाबत सरकारला 15 नोव्हेंबर रोजी अहवाल सोपवल्यानंतर  18 नोव्हेंबर रोजी शासनाने तो मंत्रीमंडळ बैठकीत सादर करून त्यातील खंड 3 मधील अंतिम शिफारशी पुर्ण स्वीकारून त्यापुढील सर्व वैधानिक कार्यवाही करण्यासाठी मंत्रीमंडळ उपसमिती गठीत केली आहे. या समितीच्या नियुक्ती संबंधीचा शासन आदेश आज सायंकाळी 5 वाजता काढण्यात आला. त्यावर मुंडे यांनी एक ट्वीट करून 5 दिवसात हि उपसमिती वैधानिक कार्यवाही कशी पूर्ण करेल ? आणि  30 नोव्हेंबरला संपणाऱ्या अधिवेशनापूर्वी कायदा करून आरक्षण कसे देणार आहे? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

जयंत पाटील आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? तटकरे आणि पटेलांसंदर्भात काय म्हणाले पाटील? 
जयंत पाटील आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? तटकरे आणि पटेलांसंदर्भात काय म्हणाले पाटील? 
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमीत साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमीत साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
मोठी बातमी! जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
Mumbai Crime : मुंबईत पोलीस स्टेशन शेजारीच थरार! दारूच्या नशेत पतीने पत्नीला दगडाने ठेचून संपवलं; ओशिवरा परिसरामध्ये खळबळ
मुंबईत पोलीस स्टेशन शेजारीच थरार! दारूच्या नशेत पतीने पत्नीला दगडाने ठेचून संपवलं; ओशिवरा परिसरामध्ये खळबळ

व्हिडीओ

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
Embed widget