एक्स्प्लोर
कॉकपीटमधून धूर निघाल्यानं एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग!
मुंबई : मुंबई विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. मुंबईहून भुवनेश्वरच्या दिशेने जाणाऱ्या विमानाचं लँडिंग करण्यात आलं आहे. या विमानानं आज दुपारी सव्वादोन वाजता भुवनेश्वरच्या दिशेनं टेक ऑफ केलं होतं.
आज दुपारी सव्वा दोन वाजता मुंबईहून भुवनेश्वरला जाणाऱ्या AI669 या विमानाच्या कॉकपिटमधून अचानक धूर येऊ लागला. पायलटनं प्रसंगावधान राखत इमर्जन्सीचा इशारा दिला. त्यामुळे या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं.
दरम्यान इमर्जन्सी लँडिंगनंतर विमानाची कसून तपासणी करण्यात आली. या विमानातील सर्व प्रवासी सुखरुप असून त्यांना दुसऱ्या विमानानं भुवनेश्वरला रवाना करण्यात येणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement