एक्स्प्लोर
एलफिन्स्टन चेंगराचेंगरी म्हणजे घातपात, जनहित याचिकेत दावा
फैजल बनारसवाला यांनी ही याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. पीडितांना योग्य तो मोबदला देण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
![एलफिन्स्टन चेंगराचेंगरी म्हणजे घातपात, जनहित याचिकेत दावा Elphinston Stampede Might Be Terror Attack Pil Seeking Nia Probe एलफिन्स्टन चेंगराचेंगरी म्हणजे घातपात, जनहित याचिकेत दावा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/29055824/stampede-at-parel-railway-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : एलफिन्स्टन चेंगराचेंगरी प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे एलफिन्सटन चेंगराचेंगरी हा घातपात असल्याचा दावा या याचिकेत केला आहे.
फैजल बनारसवाला यांनी ही याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. पीडितांना योग्य तो मोबदला देण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
न्यायमूर्ती गवई यांच्याकडे ही याचिका सादर करण्यात आली. याचिकेवर 5 ऑक्टोबरला हायकोर्टात सुनावणी होणार आहे. तसंच यासंदर्भात गुन्हा नोंदवण्यासाठी भोईवाडा पोलिस स्टेशनमध्ये अर्ज देण्यात आला आहे.
एलफिन्स्टन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीआधी पत्रा कोसळल्याच्या, शॉर्ट सर्किट झाल्याची अफवा उठल्या होत्या. परंतु अफवा उठल्याचा कोणताही उल्लेख या दुर्घटनेतून वाचलेल्या लोकांच्या जबाबात आढळला नाही. त्यामुळे या दुर्घटनेमागे घातपात असल्याची शक्यता असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
या दुर्घटनेचा तपास एनआयएकडे सोपवून यामागे दहशतवादी कृत्य आहे का याचा तपास केला जाईल, अशी मागणी करण्यात आली. तसंच चेंगराचेंगरीतील जखमींना नुकसान भरपाई म्हणून योग्य तो मोबदला देण्याचीही मागणी याचिकार्त्यांनी केली आहे.
चेंगराचेंगरीत 23 मुंबईकरांचा बळी
एलफिन्स्टन आणि परेल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर शुक्रवारी सकाळी मोठी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 23 जणांचा मृत्यू झाला, तर 39 प्रवासी जखमी झाले. सकाळी 9.30 च्या सुमारास फूट ओव्हर ब्रीजवरील पत्रा कोसळल्याची ओरड झाली. यामुळे ब्रीजवरील प्रवाशांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं. त्यातच ब्रीज पडत असल्याच्या आणि शॉर्ट सर्किट झाल्याच्या अफवा पसरल्या. त्यामुळे ब्रीजवरील प्रवाशांमध्ये एकच हलकल्लोळ माजला.
एल्फिन्स्टन- परेल पुलावर नेमकं काय घडलं?
- सकाळी 9.30 च्या सुमारास पावसाची मोठी सर आली.
- त्याचवेळी मध्य रेल्वेवरील परेल आणि पश्चिम रेल्वेवरील एल्फिन्स्टन स्टेशनवर एकाचवेळी लोकल आल्या.
- त्यामुळे बाहेर पडणाऱ्या पादचारी पुलावर गर्दी झाली.
- त्याचवेळी पत्रा कोसळल्याचं सांगण्यात आलं.
- गर्दीच्या वेळी मोठा आवाज झाल्याच्या गैरसमजातून धावपळ सुरु झाली.
- ब्रिज पडत असून शॉर्ट सर्किट झाल्याची अफवा पसरली, लोक मिळेल ती जागा पकडून बाहेर पडू लागले
- एकमेकांना तुडवत लोकांची धावपळ सुरु झाली
- सकाळी 9.30 च्यासुमारास थेट जखमी आणि मृतांचा आकडा समोर आला
- जखमींना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
- काही मिनिटांतच मृतांचा आकडा वाढत गेला
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
पुणे
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)