एक्स्प्लोर
मंत्रिमंडळ परतीची आशा धुसर, खडसेंचा 'रामटेक'ला रामराम
![मंत्रिमंडळ परतीची आशा धुसर, खडसेंचा 'रामटेक'ला रामराम Eknath Khadse Left Ramtek Bungalow मंत्रिमंडळ परतीची आशा धुसर, खडसेंचा 'रामटेक'ला रामराम](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/24092330/Eknath-Khadse-Ramtek-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : राजीनामा देऊनही वारंवार होणाऱ्या आरोपांनंतर एकनाथ खडसेंनी अखेर रामटेक बंगल्याला रामराम केला आहे. गुरुवारीच खडसेंनी रामटेक बंगला सोडून आपला मुक्काम जळगावात हलवला आहे.
मंत्रिमंडळात परतण्याची शक्यता मावळल्यानंच खडसेंनी रामटेक बंगला सोडण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर रामटेक या शासकीय बंगल्यात खडसे राहत होते. मात्र काही महिन्यांपूर्वी खडसेंवर अनेक आरोप लागल्यानंतर मंत्रिपदापासून त्यांना दूर ठेवण्यात आलं.
मंत्रिपदावरुन पायउतार झाल्यानंतर साधारण सहा ते सात महिन्यांच्या काळात मंत्री आपला मुक्काम हलवतात. एकनाथ खडसेंना आपल्याला क्लीन चिट मिळण्याची अपेक्षा होती. मात्र चौकशी करणाऱ्या झोटिंग समितीला मुदतवाढ नाकारल्यामुळे खडसेंची मंत्रिपदी पुन्हा विराजमान होण्याची शक्यता धुसर झाल्याचं म्हटलं जातं. म्हणून एकनाथ खडसेंनी रामटेक बंगल्याला रामराम ठोकला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
विश्व
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)