एक्स्प्लोर
Advertisement
एव्हीएशन घोटाळ्याप्रकरणी प्रफुल पटेलांना इडीची नोटीस, 6 जूनला चौकशी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमागे ईडीच्या (अंमलबजावणी संचालनालय) चौकशीचा ससेमिरा सुरुच आहे. राष्ट्रवादीचे माजी खासदार आणि माजी हवाई वाहतूकमंत्री प्रफुल पटेल यांना कथित एव्हीएशन घोटाळ्याप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमागे ईडीच्या (अंमलबजावणी संचालनालय) चौकशीचा ससेमिरा सुरुच आहे. राष्ट्रवादीचे माजी खासदार आणि माजी हवाई वाहतूकमंत्री प्रफुल पटेल यांना कथित एव्हीएशन घोटाळ्याप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली आहे. याप्रकरणी 6 जून रोजी प्रफुल्ल पटेल यांची ईडीकडून चौकशी होणार आहे.
बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळांची ईडीमार्फत चौकशी सुरु आहे. तसेच सिंचन घोटाळ्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे यांची एसीबीमार्फत चौकशी सुरु आहे. चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या यादीत आता प्रफुल पटेलांच्या नावाची भर पडली आहे. दरम्यान, सरकार ईडीसारख्या यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातत्याने करण्यात आला आहे.
एव्हीएशन घोटाळ्याप्रकरणी ईडीने ऑगस्ट 2017 मध्ये चौकशी सुरू केली होती. याप्रकरणी सीबीआयने हवाई वाहतूक मंत्रालयाचे अधिकारी, एनसीआयएल आणि एअर इंडियाविरोधात एफआयआर दाखल केला होता. याप्रकरणी कॉर्पोरेट लॉबिस्ट दीपक तलवार याला अटकदेखील करण्यात आली होती.
ईडीच्या आरोपांनुसार दीपक तलवारनेच परदेशी विमान कंपन्यांना फायदा मिळवून देण्यासाठी पटेलांशी मध्यस्थी केली होती. एमिरेट्स आणि एअर अरेबिया या दोन विमान कंपन्यांना फायदा मिळवून दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
70 हजार कोटी रुपये किंमतीच्या 111 विमानांची खरेदी, एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्सचे विलीनीकरण याप्रकरणांचादेखील ईडीकडून तपास सुरु आहे. प्रफुल पटेल नागरी उड्डाणमंत्री असताना हा मोठा घोटाळा झाला होता. त्यामुळेच पटेलांची चौकशी सुरु होणार आहे. दरम्यान, याप्रकरणी मी ईडीला पूर्ण सहकार्य करेन, अशी प्रतिक्रिया प्रफुल पटेल यांनी दिली आहे.Enforcement Directorate Lawyer: ED summons Praful Patel in the Deepak Talwar illicit aviation deals case, on June 6. pic.twitter.com/l2C3oSG6x2
— ANI (@ANI) June 1, 2019
याप्रकरणी मोदींनी दिले होते संकेत लोकसभा निवडणुकीच्यावेळी गोंदिया येथे भाजपने आयोजित केलेल्या प्रचारसभेत बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कारवाईचे संकेत दिले होते. मोदी म्हणाले होते की, "तिहार जेलमधील एका कैद्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप उडवली आहे."Former Civil Aviation Minister and NCP leader Praful Patel to ANI: I will be happy to cooperate with the Enforcement Directorate to help them understand the complexities of aviation sector. pic.twitter.com/Q8n6uZdBEO
— ANI (@ANI) June 1, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
करमणूक
राजकारण
Advertisement