एक्स्प्लोर

डॉ. झाकीर नाईकविरोधात ईडीकडून पहिलं आरोपपत्र दाखल,193.6 कोटींची बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याचा आरोप

दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देत मुस्लिम तरूणांची माथी भडकवल्याचा आरोप असलेला इस्लामी उपदेशक डॉ. झाकिर नाईक याच्या माझगावमधील पाच मालमत्तांवर जप्ती आणण्याचे आदेश मुंबईच्या विशेष न्यायालयाने दिले होते.

मुंबई : इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचा सर्वेसर्वा डॉ. झाकीर नाईक विरोधात गुरूवारी प्रवर्तन निर्देशनालय म्हणजेच ईडीनं आरोपपत्र दाखल केलं आहे. मुंबई सत्र न्यायालयातील पीएमएलए कोर्टात हे आरोपपत्र सादर करण्यात आलं. 193.6 कोटींची बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याचा आरोप या आरोपत्रात नाईकवर ठेवण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणातलं हे दुसरं आरोपपत्र असलं तरी प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँड्रिंग अॅक्ट खालील हे पहिलंच आरोपपत्र आहे. ज्यात झाकीर नाईकच्या काळ्या पैशांबाबत माहीती देण्यात आली आहे. श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्याच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकन सरकारनं नुकतीच नाईकच्या पीसी टीव्ही या चॅनलच्या प्रसारणावर बंदी घातली आहे.
दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देत मुस्लिम तरूणांची माथी भडकवल्याचा आरोप असलेला इस्लामी उपदेशक डॉ. झाकीर नाईक याच्या माझगावमधील पाच मालमत्तांवर जप्ती आणण्याचे आदेश मुंबईच्या विशेष न्यायालयाने दिले होते.
‘क्रिस्टल रेसिडेन्सी’ या इमारतीच्या ए विंगमधील ए-103 हा एक हजार 360 चौ. फुटांचा व्यावसायिक गाळा, जास्मिन सोसायटीमधील बी-1005 आणि बी-1006 हे दोन फ्लॅट, मारिया हाईट्स या इमारतीतील 1701 आणि 1702 हे दोन फ्लॅट अशा पाच मालमत्तांवर टाच आणण्याचे आदेश विशेष न्यायालयाने दिले होते.
52 वर्षीय झाकीर नाईकच्या प्रक्षोभक आणि चिथावणीखोर भाषणांमुळे दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन मिळत असल्याचे उघड झाल्यानंतर केंद्र सरकारने नोव्हेंबर 2016 मध्ये त्याची मुंबईतील ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’ ही संस्था बेकायदा ठरवली. तसेच राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच (एनआयए) कडून त्याच्याविरुद्ध बेकायदेशीर कारवाई प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हे नोंदवले. हा गुन्हा नोंदवला गेला तेव्हा नाईक देशाबाहेर होता जो अजूनही भारतात परतलेला नाही.
 
एनआयएनं झाकीर नाईक विरोधात 4 हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलंय. यात आयपीसी कलम 153 अ, युएपीए कायदा 1967 च्या कलम 10, 13 आणि 18 अंतर्गत आरोप लावण्यात आलेत. अतिरेकी संघटनांशी संबंध, अतिरेकी कारवायांसाठी निधी गोळा करणे, युवावर्गाची दिशाभूल करून त्यांना अतिरेकी कारवायांसाठी प्रेरीत करणे, प्रक्षोभक भाषणं करण अशा प्रकारचे गंभीर गुन्हे यात समाविष्ट करण्यात आले आहेत. 
आयआरएफ या संघटनेवर बंदी घातल्यानंतर तपासयंत्रणांनी त्यांची वेबसाईट, सोशल नेटवर्किंग अकाऊंट, यु ट्यूब चॅनल सारं काही बंद करून टाकलंय. तसेच देशभरात 17 ठिकाणी छापे टाकून या संघटनेशी संबंधित अनेकांना अटकही केली आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?

व्हिडीओ

BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Geeta Gawali Mumbai : अरुण गवळीची लेक निवडणुकीच्या रिंगणात, गीता गवळींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
Embed widget