एक्स्प्लोर
मुंबईतील जिओडेसिक कंपनीच्या संचालकांना अटक
कंपनीवर अवैधरित्या भारतातून 815 कोटी रुपये परदेशात वळवल्याचा आरोप आहे. कंपनीच्या शेअर होल्डरचे पैसे परदेशात गुंतवणूक करण्याच्या नावाखाली परदेशात वळवल्याची माहिती आहे
मुंबई : पैशांची अफरातफर केल्याचं आणखी एक मोठं प्रकरण समोर आलं आहे. मुंबईतील जिओडेसिक (geodesic) या कंपनीवर छापा टाकत ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाने कंपनीच्या संचालकांना अटक केली आहे.
कंपनीचे संचालक किरण प्रकाश कुलकर्णी आणि पंकज श्रीवास्तव यांनी अटक करण्यात आली. कंपनीवर अवैधरित्या भारतातून 815 कोटी रुपये परदेशात वळवल्याचा आरोप आहे.
कंपनीच्या शेअर होल्डरचे पैसे परदेशात गुंतवणूक करण्याच्या नावाखाली परदेशात वळवल्याची माहिती आहे. जिओडेसिक ही डिजिटल अॅप्लिकेशनच्या सर्व्हिस प्रोव्हाईड करते.
जिओडेसिकने मुंडू टीव्ही हे अॅप्लिकेशन तयार केलं होतं. पैशांची अफरातफर केल्याचा आकडा 1000 कोटींवर जाण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement