मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या 42 पैकी 32 समूह महाविद्यालयात परीक्षा सुरळीत
विद्यापीठ विभागामध्ये आयोजित करण्यात आलेल्या परीक्षा सुरळीत पार पडल्या असून एकूण 582 विद्यार्थ्यांपैकी 561 विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या परीक्षा दिली.
मुंबई : काही काळासाठी खंडीत झालेल्या वीज पुरवठ्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या सलंग्नित महाविद्यालयातील काही समुह महाविद्यालयांच्या अंतिम वर्ष परीक्षा सुरळीत पार पडल्या तर काही समुह महाविद्यालयांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. कला, वाणिज्य आणि विज्ञान समुह महाविद्यालयांच्या एकणू 42 समुहांपैकी 32 समुहांमध्ये परीक्षा सुरळीत पार पडल्या. यामध्ये 19 हजार 279 एवढ्या विद्यार्थ्यांपैकी 18 हजार 950 एवढ्या विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या परीक्षा दिली. या 32 क्लस्टरमधील 5 क्लस्टर्सच्या अंशतः काही महाविद्यालयांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यात.
तर 10 समुह महाविद्यालयांनी त्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या. पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षांचे नियोजन त्या-त्या महाविद्यालयांच्या मार्फत करण्यात येईल. काही महाविद्यालयांच्या परीक्षा संपलेल्या आहेत. विद्यापीठ विभागामध्ये आयोजित करण्यात आलेल्या परीक्षा सुरळीत पार पडल्या असून एकूण 582 विद्यार्थ्यांपैकी 561 विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या परीक्षा दिली. अभियांत्रिकी आणि एमसीएच्या एकूण 10 समुहातील आजच्या नियोजीत बॅकलॉगच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून या परीक्षांचे नियोजन 14 ऑक्टोबरला करण्यात आले आहे.
फार्मसीच्या तीनही समुहातील आजच्या नियोजित परीक्षा आता 15 ऑक्टोबरला होणार आहेत. शिक्षणशास्त्रच्या 10 समुहातील दोन महाविद्यालये वगळता इतरांच्या परीक्षा सुरळीत पार पडल्या यामध्ये 2018 विद्यार्थ्यांपैकी 2007 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. स्पेशल एज्युकेशन, फिजीकल एज्युकेशन आणि सोशल वर्क समुहांच्या परीक्षा सुरळीत पार पडल्या. विधी समुहातील 9 क्लस्टरमधील 7 महाविद्यालयांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आले असून उर्वरीत 505 विद्यार्थ्यांपैकी 504 विद्यार्थ्यांची परीक्षा सुरळीत झाली.
मुंबई पॉवरकटने हैराण, मग शेतकऱ्यांचं काय होत असेल मुंबईकरांनो? 8तास लोडशेडिंग झेलणाऱ्यांचं मत ऐका