एक्स्प्लोर
अवकाळी पावसामुळे किरकोळ बाजारात भाज्यांचे दर वाढले
छटपुजा आल्याने आलेल्या भाजीपाल्याला एपीएमसीत उठाव नसल्याने भाव स्थिर आहेत. मात्र दुसरीकडे किरकोळ मार्केटला दर वाढले आहेत. पावसामुळे विकत घेतलेला माल खराब निघत असल्याने दर चढे असल्याचे किरकोळ व्यापारी सांगत आहेत.
नवी मुंबई : राज्यभर पडत असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचा मोठं नुकसान झालं आहे. शेतातील उभी पिकं आडवी झाली आहेत. या नुकसानीची झळ आता शहरी भागांनाही बसू लागली आहे. अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान झाल्याने भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. भाजीपाला एपीएमसीमध्ये येतोय तोही पावसामुळे भिजून खराब झालेला आहे.
छटपुजा आल्याने आलेल्या भाजीपाल्याला एपीएमसीत उठाव नसल्याने भाव स्थिर आहेत. मात्र दुसरीकडे किरकोळ मार्केटला दर वाढले आहेत. पावसामुळे विकत घेतलेला माल खराब निघत असल्याने दर चढे असल्याचे किरकोळ व्यापारी सांगत आहेत. सध्या किरकोळ बाजारात भाज्यांचे दर 80 रुपयांच्या वर पोचले आहेत. वाटाणा 150 रुपये तर शेवगा चक्क 250 रुपयांवर गेला आहे. पाले भाज्यांचे दरही चांगले वाढले आहेत.
किरकोळ बाजारातील भाज्यांचे दर
- वांगी - 80 रु. किलो
- दोडका - 80 रु. किलो
- कार्ली - 60 रु. किलो
- शेवगा - 280 रु. किलो
- कोबी - 60 रु. किलो
- पावटा - 80 रु. किलो
- गाजर - 100 रु. किलो
- काकडी - 50 रु. किलो
- वाटाणा - 140-150 रु. किलो
- टोमॅटो - 60 रु. किलो
- गवार - 80 रु. किलो
- भेंडी - 80 रु. किलो
- कोथींबीर - 40 रु. प्रति जुडी
- मेथी - 40 रु. प्रति जुडी
- पालक - 50 रु. प्रति जुडी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement