एक्स्प्लोर

डीएसके पुत्र शिरीष कुलकर्णींचा अटकपूर्व जामीन फेटाळला

शिरीष कुलकर्णी यांना 18 जूनपर्यंत अटकेपासून हायकोर्टानं दिलासा दिला आहे.

मुंबई : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णींचे पुत्र शिरीष कुलकर्णी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावला आहे. मात्र शिरीष कुलकर्णी यांना 18 जूनपर्यंत अटकेपासून हायकोर्टानं दिलासा दिला आहे. पुढील दहा दिवस दररोज तपास अधिकाऱ्यांपुढे हजेरी लावण्याचे निर्देश यावेळी हायकोर्टानं दिले आहेत. दोन हजार 43 कोटींच्या आर्थिक फसवणुकीच्या या प्रकरणात डी. एस. कुलकर्णी त्यांच्या पत्नी हेमंती यांच्यासह एकूण सात जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. लोकांकडून आलेला पैसा गैरमार्गानं आपल्या कुटुंबीयांच्या नावे वळवणं ही या संपूर्ण घोटाळ्याची कार्यपद्धती होती असं निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलं. डी. एस. कुलकर्णी यांचे पुत्र शिरीष कुलकर्णी यांना अटकेपासून दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट नकार दिला. शिरीष कुलकर्णी हे स्वत:ला डीएसके या ब्रँडपासून वेगळं ठरवू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या अटकपूर्व जामिनावरील युक्तिवाद ऐकण्यास आम्हाला मुळीच रस नाही, असं म्हणत आम्ही अटकपूर्व जामीन फेटाळून लावण्याऐवजी तुम्ही तो मागे घ्या असे स्पष्ट निर्देश न्यायमूर्ती साधना जाधव यांनी दिले होते. शिरीष कुलकर्णी यांची पत्नी तन्वी कुलकर्णी यांनीही पुणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केल्याची माहिती मंगळवारच्या सुनावणीत हायकोर्टासमोर ठेवण्यात आली. अनेक ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केल्याबद्दल सध्या डी. एस. कुलकर्णीं, त्यांच्या पत्नी हेमंती यांच्यासह एकूण सात जणांना अटक झाली आहे. यात मुख्यत्वे त्यांच्या परिवारातील सदस्यांचा समावेश आहे. कारण आपल्या परिवारातील अनेकांच्या नावांवार डी. एस. कुलकर्णींनी आपले आर्थिक गैरव्यवहार व्यवहार केल्याचे पुरावे पुणे पोलिसांच्या हाती लागले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA : तुमच्याकडे तलवार आहे, पण त्याने डास मारता, अधिकारांचं प्रदर्शन करता; हॉटेलवरील धाडीवरून कोर्टाने FDAला फटकारलं
तुमच्याकडे तलवार आहे, पण त्याने डास मारता, अधिकारांचं प्रदर्शन करता; हॉटेलवरील धाडीवरून कोर्टाने FDAला फटकारलं
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Mumbai Crime News: कुटुंबापासून दूर मुंबईत शिक्षणासाठी आला, मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यानं 12 व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं; मन सुन्न करणारी घटना!
कुटुंबापासून दूर मुंबईत शिक्षणासाठी आला, मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यानं 12 व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं; मन सुन्न करणारी घटना!

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
Embed widget