एक्स्प्लोर

7 नगरसेवक, 13 आमदार ते मनसेकडे उरलेला एकटा नगरसेवक

2007 मध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक ही मनसेने लढवलेली पहिली निवडणूक. त्यावेळी मनसेचे 7 नगरसेवक निवडून आले होते.

मुंबई : मुंबई महापालिकेतील मनसेचे सातपैकी सहा नगरसेवक हे शिवसेनेसोबत जाणार आहेत. मुंबई महापालिकेत लवकरच आमचा महापौर बसवू, अशी बतावणी करणाऱ्या भाजपला शिवसेनेनं जोरदार धक्का दिला आहे. मात्र एकप्रकारे ही मनसेची वाताहत असल्याचंच म्हटलं जात आहे. मनसेचा इतिहास 9 मार्च 2006 रोजी मनसेची स्थापना 2007 मध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक ही मनसेने लढवलेली पहिली निवडणूक. त्यावेळी मनसेचे 7 नगरसेवक निवडून आले होते. पुणे महानगरपालिकेत मनसेचे 8, नाशिक महानगरपालिकेत 12 आणि ठाणे महापालिकेत 3 नगरसेवक निवडून आले. 2008 साली लोकसभा निवडणूक झाली त्यावेळी मनसेचा एकही खासदार निवडून आला नाही, मात्र तत्कालीन खासदारांना त्यांनी टफ फाईट दिली. 2008 मध्ये राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे तब्बल 13 आमदार निवडून आले. खरा इतिहास घडला जेव्हा 2012 साली नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेचे 40 नगरसेवक निवडून आले आणि राष्ट्रवादीच्या मदतीनं त्यांनी सत्तेची पाच वर्ष पूर्ण केली. पुणे महापालिकेत 29 नगरसेवक निवडून आले होते. त्याचवेळी पिंपरीमधे मनसेचे 4 नगरसेवक होते. त्यानंतर मात्र राज ठाकरेंची भूमिका कुठे चुकली हा प्रश्न पडावा अशी उतरती कळा मनसेला लागली. 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेची कुठेही चुणूक दिसली नाही. त्यापाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा केवळ एक आमदार निवडून आला होता तो म्हणजे जुन्नरमधून शरद सोनवणे. 2017 साली झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत सात नगरसेवक निवडून आले. मुख्य म्हणजे ज्या नाशिक महापालिकेतील कामाचा गवगवा केला त्या पालिकेच्या निवडणुकीपूर्वी 25 नगरसेवक मनसेला सोडून गेले आणि पालिका निवडणुकीत निवडून आले ते केवळ 5 नगरसेवक. त्याचवेळी, सध्या पुणे महापालिकेत मनसेचे केवळ 3 नगरसेवक आहेत तर पिंपरी महानगरपालिकेत 1 नगरसेवक आहे. राज ठाकरे यांनी घेतलेल्या अनाकलनीय भूमिका, लोकसभेत नरेंद्र मोदी यांना दिलेला पाठिंबा व नाशिक महापालिकेतील निष्क्रीय कारभारामुळे मनसेचा प्रभाव पूर्णपणे ओसरल्या असल्याचं राजकीय निरिक्षकांचं म्हणणं आहे. मुंबई महापालिकेतील मनसेचे नगरसेवक : अर्चना भालेराव – वॉर्ड 126 परमेश्वर कदम – वॉर्ड 133 अश्विनी मतेकर- वॉर्ड 156 दिलीप लांडे – वॉर्ड 163 संजय तुर्डे – वॉर्ड 166 हर्षल मोरे – वॉर्ड 189 दत्ताराम नरवणकर- वॉर्ड 197 वॉर्ड क्र. 166चे संजय तुर्डे सोडता सहाही नगरसेवक हे शिवसेनेसोबत गेले आहेत. मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल = 227
  • शिवसेना अपक्षांसह – 84 +  4 अपक्ष = 88
  • भाजप अभासे आणि एक अपक्षासह – 83+अपक्ष 2= 85
  • कॉंग्रेस – 30
  • राष्ट्रवादी कॉंग्रेस – 9
  • मनसे – 7
  • सपा – 6
  • एमआयएम – 2
 
संबंधित बातम्या :

पहिल्या मास्टरस्ट्रोकनंतर शिवसेनेची तात्काळ दुसरी खेळी!

शिवसेनेचा मास्टरस्ट्रोक, मनसेचे सहा नगरसेवक सेनेसोबत

मनसेची साथ न सोडणारा एकमेव नगरसेवक कोण?

मॉकड्रीलचं कारण देत मुंबई महापालिकेच सर्व दरवाजे बंद!

करोडो देऊन शिवसेनेकडून नगरसेवकांची खरेदी, सोमय्यांचा गंभीर आरोप

दगाफटका योग्य नाही, नगरसेवकांवर राज ठाकरे भडकले

‘लवकरच मुंबईत आमचा महापौर’, सोमय्यांचं शिवसेनेला आव्हान

मोठे दावे करणार्‍यांचे पोट फाडून भाजपचा विजय : आशिष शेलार

भांडुप पोटनिवडणुकीत भाजपचा विजय, सत्ता समीकरणं कशी बदलणार?

मुंबई वॉर्ड क्रमांक 116 पोटनिवडणूक : भाजपच्या जागृती पाटील विजयी

करोडो देऊन शिवसेनेकडून नगरसेवकांची खरेदी, सोमय्यांचा गंभीर आरोप

शिवसेनेला पश्चाताप, जागृती पाटील सेनेत येणार होत्या!

फोडाफोडी आणि थैलीशाहीचे राजकारण नेहमीच यशस्वी होत नाही: शिवसेना

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मला सेटल व्हायचं आहे, हळद लागल्याचा व्हिडिओ व्हायरल; छोट्या पुढाऱ्याने लग्नाबाबत स्पष्टच सांगितलं
मला सेटल व्हायचं आहे, हळद लागल्याचा व्हिडिओ व्हायरल; छोट्या पुढाऱ्याने लग्नाबाबत स्पष्टच सांगितलं
Pune Crime News: विमानतळावर बॅग चेकिंग; 2 चिप्सचे डबे उघडताच अधिकाऱ्यांनाही बसला धक्का, 72 लाख रुपयांचा...पुण्यातील धक्कादायक प्रकार
विमानतळावर बॅग चेकिंग; 2 चिप्सचे डबे उघडताच अधिकाऱ्यांनाही बसला धक्का, 72 लाख रुपयांचा...पुण्यातील धक्कादायक प्रकार
Kolhapur Collectorate Office: पाच आरडीएक्स बाॅम्ब लवकरच फुटणार! कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी
पाच आरडीएक्स बाॅम्ब लवकरच फुटणार! कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी
Kritika Kamra Gaurav Kapur: रिलेशनशिप कन्फर्म केल्यानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले कृतिका अन् गौरव; चाहत्यांनी म्हटलं, किती गोड जोडी!
रिलेशनशिप कन्फर्म केल्यानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले कृतिका अन् गौरव; चाहत्यांनी म्हटलं, किती गोड जोडी!

व्हिडीओ

Prasad Lad Shock : प्रसाद लाड यांना परिषदेत शॉक, म्हणाले; मला काही झाल्यास राज्याचं नुकसान..
Nawab Malik Vs BJP : मलिकांऐवजी दुसऱ्याकडं नेतृत्व दिल्यास भाजपचा आक्षेप नसणार - सूत्र
Nagpur Leopard Special Report बिबट्याचं संकट पण वनविभागाची यंत्रणा भंगार, बिबट्याला नेणारी गाडीच बंद
Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मला सेटल व्हायचं आहे, हळद लागल्याचा व्हिडिओ व्हायरल; छोट्या पुढाऱ्याने लग्नाबाबत स्पष्टच सांगितलं
मला सेटल व्हायचं आहे, हळद लागल्याचा व्हिडिओ व्हायरल; छोट्या पुढाऱ्याने लग्नाबाबत स्पष्टच सांगितलं
Pune Crime News: विमानतळावर बॅग चेकिंग; 2 चिप्सचे डबे उघडताच अधिकाऱ्यांनाही बसला धक्का, 72 लाख रुपयांचा...पुण्यातील धक्कादायक प्रकार
विमानतळावर बॅग चेकिंग; 2 चिप्सचे डबे उघडताच अधिकाऱ्यांनाही बसला धक्का, 72 लाख रुपयांचा...पुण्यातील धक्कादायक प्रकार
Kolhapur Collectorate Office: पाच आरडीएक्स बाॅम्ब लवकरच फुटणार! कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी
पाच आरडीएक्स बाॅम्ब लवकरच फुटणार! कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी
Kritika Kamra Gaurav Kapur: रिलेशनशिप कन्फर्म केल्यानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले कृतिका अन् गौरव; चाहत्यांनी म्हटलं, किती गोड जोडी!
रिलेशनशिप कन्फर्म केल्यानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले कृतिका अन् गौरव; चाहत्यांनी म्हटलं, किती गोड जोडी!
आजपासून 9 कोटी मोजून अमेरिकन नागरिक होण्याची संधी! डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरु केली योजना
आजपासून 9 कोटी मोजून अमेरिकन नागरिक होण्याची संधी! डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरु केली योजना
Mexico Tarrif on India: डोनाल्ड ट्रम्प सुट्टी देईनात तोपर्यंत आता मेक्सिकोचा सुद्धा भारताला दणका सुरु! किती टक्के टॅरिफ लावला?
डोनाल्ड ट्रम्प सुट्टी देईनात तोपर्यंत आता मेक्सिकोचा सुद्धा भारताला दणका सुरु! किती टक्के टॅरिफ लावला?
Dhurandhar Movie: 'धुरंधर'चा देशात कमाईचा धुमधडाका, पण पाकिस्तान विरोधाची मिर्ची लागल्याने 'या' सहा देशांनी थेट बॅन केला!
'धुरंधर'चा देशात कमाईचा धुमधडाका, पण पाकिस्तान विरोधाची मिर्ची लागल्याने 'या' सहा देशांनी थेट बॅन केला!
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! गेल्या दोन वर्षात तब्बल 1951 वेळा विमानांच्या GPS सिस्टममध्ये छेडछाड; मोदी सरकारची 12 दिवसात दुसऱ्यांदा थेट कबुली
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! गेल्या दोन वर्षात तब्बल 1951 वेळा विमानांच्या GPS सिस्टममध्ये छेडछाड; मोदी सरकारची 12 दिवसात दुसऱ्यांदा थेट कबुली
Embed widget