एक्स्प्लोर
दिलासादायक... राज्यातील कोरोना रुग्णांच्या दुप्पटीचा वेग दोन वरून साडेपाच दिवसांवर
राज्याचा कोरोना रुग्णांच्या दुप्पटीचा वेग हा पूर्वी दोन दिवस होता तो नंतर साडेतीन झाला आता सध्या साडेपाच दिवस एवढा झाला आहे. हा दुपटीचा वेगाचा कालावधी जेवढा वाढेल तेवढी रुग्णसंख्या कमी होईल.

मुंबई : राज्यात कंटेनमेंट कृतीआराखड्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत असल्याने कोरोना रुग्णांच्या दुप्पटीच्या दराचा वेग हा दोन दिवसांवरून साडेपाच दिवसांवर गेला आहे. हा कालावधी जेवढा वाढेल ती राज्याच्या दृष्टीने समाधानाची बाब असेल. राज्याचा कोरोना रुग्णांच्या दुप्पटीचा वेग हा पूर्वी दोन दिवस होता तो नंतर साडेतीन झाला आता सध्या साडेपाच दिवस एवढा झाला आहे. हा दुपटीचा वेगाचा कालावधी जेवढा वाढेल तेवढी रुग्णसंख्या कमी होईल.
राज्याचा कोरोना रुग्णांचा मृत्यूदर देशात जास्त आहे. त्यातील 83 टक्के मृत्यू हे रुग्णाला पुर्वीपासून जडलेल्या मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, मुत्रपिंडचा विकार यामुळे झाले आहेत.
आनंदाची बातमी! कोरोनाशी युद्ध जिंकणाऱ्यांमध्ये चिमुकल्यापासून ते आज्जीबाईंचा समावेश
कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करण्यासाठी तज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यांच्या मार्फत राज्यात उपचार सुरू असलेल्या कोरोना रुग्णासाठ तातडीचा वैदयकीय सल्ला दिला जाईल. त्यासाठी समितीतील तज्ञांचे संपर्क क्रमांक राज्यभरातील रुग्णालयांना कळविण्यात आले आहेत.
Coronavirus World Update | जगभरातील कोरोना बाधितांचा आकडा 21 लाख पार; तर मृतांचा आकडा 1.45 लाख पार
राज्यात आतापर्यंत झालेल्या चाचण्यांपैकी निम्म्या चाचण्या ह्या मुंबईत करण्यात आल्या आहेत. पुल टेस्टींग, रॅपीड टेस्टींगसाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडे (आयसीएमआर) परवानगी मागितली आहे.
'हाय रिस्क' गटातील व्यक्तींची वैद्यकीय चाचणी 7 दिवसांच्या विलगीकरणानंतर
कोरोना 'कोविड 19' आजाराची लागण झालेल्या अनेक बाधित व्यक्तींमध्ये आजाराची प्राथमिक लक्षणे दिसतातच असे नाही. अनेकदा लक्षणे न दिसणाऱ्यांची (Asymptomatic Patients) वैद्यकीय चाचणी केली असता, ती लागण झाल्यापासून साधारणपणे सुरुवातीचे 7 दिवस 'फॉल्स निगेटिव्ह' येत असल्याचेही निदर्शनास आले आहे. जे वस्तुतः बाधित आहेत, परंतु त्यांची वैद्यकीय चाचणी मात्र 'निगेटिव्ह' येत आहे; अशा चाचण्यांना वैद्यकीय परिभाषेत 'फॉल्स निगेटिव्ह टेस्ट' असे संबोधले जाते. या पार्श्वभूमीवर ज्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, त्यांच्या संपर्कातील 'हाय रिस्क' गटातील व्यक्तींची वैद्यकीय चाचणी ही किमान 7 दिवसांच्या विलगीकरणानंतर करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगर पालिकेने घेतला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
भारत
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
