एक्स्प्लोर
डोंबिवलीत किरकोळ कारणावरून हॉटेलची तोडफोड
हॉटेलमध्ये मद्यपान करणाऱ्या एक इसमाने फॅमिली सेक्शनमध्ये जाऊन लघुशंका केल्यानं त्याला मॅनेजरने हटकलं, यावरून सदर इसमाने त्याच्या साथीदारांना बोलावत मॅनेजरला मारहाण केली.

मुंबई : किरकोळ कारणावरून झालेल्या वादात तरुणांनी हॉटेलची तोडफोड केल्याचा प्रकार डोंबिवलीत घडला आहे. टिळकनगर पोलिसांच्या समोरच हा धुडगूस घालण्यात आल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
डोंबिवली पूर्वेच्या खंबाळपाडा भागात असलेल्या बंदिश पॅलेस हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. या हॉटेलमध्ये मद्यपान करणाऱ्या एक इसमाने फॅमिली सेक्शनमध्ये जाऊन लघुशंका केल्यानं त्याला मॅनेजरने हटकलं, यावरून सदर इसमाने त्याच्या साथीदारांना बोलावत मॅनेजरला मारहाण केली.
याचदरम्यान पोलीस तिथे दाखल झाले. मात्र तरीही या टोळक्यानं पोलिसांसमोर हॉटेलच्या काचा, फिशटँक, कुंड्या यांची तोडफोड केली. यामुळे इतर वेळी सिंघमच्या भूमिकेत असलेल्या पोलिसांचं अशा घटनांच्या वेळी मांजर का होतं? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
निवडणूक























