एक्स्प्लोर

कोरोनामुळे मधुमेही नसलेल्या रुग्णांच्या रक्तातील साखरेच्या पातळीत धोकादायक वाढ

ज्या रुग्णांना मधुमेहाचा इतिहास नाही, अशा रुग्णांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण सतत वाढत असल्याने डॉक्टरांसाठी हे चिंतेची बाब ठरत आहे. नुकत्याच झालेल्या संशोनधानुसार आता कोरोनाव्हायरसही रक्तातील साखरेची पातळी वाढवत असल्याचे दिसून आले आहे.

मुंबई : इंटरनॅशनल डायबेटिज फेडरेशनच्या मते, "मधुमेही रुग्णांच्या संख्येत भारत हा जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, असामान्य कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसेराइड पातळी हे मधुमेहाला आमंत्रित करतात. नुकत्याच झालेल्या संशोनधानुसार आता कोरोनाव्हायरसही रक्तातील साखरेची पातळी वाढवत असल्याचे दिसून आले आहे. ज्या रुग्णांना मधुमेहाचा इतिहास नाही, अशा रुग्णांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण सतत वाढत असल्याने डॉक्टरांसाठी हे चिंतेची बाब ठरत आहे." रुग्णालयात असे सुमारे चार ते पाच रुग्ण आढळत आहेत. "मधुमेहाचे रुग्णही केटोएसीडोसिससारखी समस्या घेऊन रुग्णालयात येत आहेत," अशी प्रतिक्रिया मुंबई सेंट्रलच्या वोक्हार्ट हॉस्पिटलच्या क्रिटिकल केअरचे प्रमुख आणि (कोविड-19) टास्क फोर्स समितीचे सदस्य डॉ. केदार तोरस्कर यांनी व्यक्त केली.

दिवसेंदिवस भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. कोरोनाच्या या विषाणूचं शास्त्रीय नाव Sars Cov-2 आहे. शरीरात प्रवेश केल्यावर हा विषाणू चिकटून बसतो. श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो. हा विषाणू सर्वांत आधी घशाच्या आसपासच्या पेशींना लक्ष्य करतो. त्यानंतर श्वसननलिका आणि फुफ्फुसांवर हल्ला चढवतो. श्वसननलिका आणि फुफ्फुसांमध्ये कोरोना विषाणूंच्या संख्येत वाढ होते. या ठिकाणी तयार झालेले नवीन कोरोना विषाणू इतर पेशींवरही हल्ला करतात. कोरोना या विषाणूचा एक प्रकार म्हणजे सार्स. सार्स प्रकारातील कोरोना विषाणू अत्यंत घातक मानला जातो. असे आढळले आहे की कोरोनाग्रस्त बर्‍याच रुग्णांना मधुमेह नसतानाही त्यांच्या रक्तातील साखरेची पातळीत वाढली असून अशा रुग्णांना धोका असल्याचे दिसून आले. साखरेची उच्च पातळी पातळी आणि केटोआसिडोसिससारख्या समस्या असलेले रुग्ण हे कोविड पॉझिटिव्ह आढळल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

एका 41 वर्षीय महिलेला गेल्या पाच दिवसांपासून ताप येणे, घसा खवखवणे आणि अंगदुखी तसेच तीन दिवसांपासून त्या महिलेला श्वास घेण्यास त्रास होणे आदी समस्या जाणवत असल्याने रुग्णालयात उपचारांकरता दाखल करण्यात आले होते. सतत तहान लागणे तसेच वारंवार लघवी होणे अशी इतर कोणतीच लक्षणे या महिलेमध्ये दिसून आली नाही. या महिलेची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली. रुग्णाला आपत्कालीन विभागात प्रवेशासाठी सादर केले. रक्तातील साखर 530 इतकी होती. तिचा सीरम आणि युरिन केटोन्स पॉझिटिव्ह होते. महिलेला मधुमेहाचा पूर्व इतिहास नसल्याची माहितीही डॉक्टरांनी दिली.

"कोरोनाचा विषाणू माणसाच्या शरीरातील पेशींमध्ये प्रवेश करण्यास एसीई-2 हे प्रथिन साहाय्यभूत ठरते. हे प्रथिन फुप्फुसच नव्हे तर स्वादुपिंड, लहान आतडे, मूत्रपिंडातही अस्तित्वात असते. पेशींमध्ये कोरोनाच्या विषाणूने शिरकाव केल्यानंतर शरीरातील ग्लुकोजच्या प्रमाणावर त्याचा विपरित परिणाम होतो," अशी माहिती डॉ केदार तोरस्कर यांनी दिली. तसेच कोरोना व्हायरस हिमोग्लोबिनवर हल्ला करत असल्याने ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होते. शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना योग्य पद्धतीने रक्त पुरवठा होत नाही. त्यामुळे शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना ऑक्सिजन मिळत नाही आणि रुग्ण मल्टी ऑर्गन फेल्युअरकडे जातो.

मधुमेह नसलेल्या रुग्णांमध्येही मृत्यू ओढावण्याची दाट शक्यता आहे. मधुमेह नसलेल्या रुग्णांमध्ये उच्च रक्तदाब धोकादायक ठरते आहे. तर, ही एक सामान्य गोष्ट आहे. 60 वर्षावरील व्यक्तींमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. केवळ मुंबईतच नव्हे तर जगभरात या वयोगटातील व्यक्तींमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. डॉ. तोरस्कर म्हणाले की, "मुंबईतील सद्य परिस्थिती पाहता आयसीयूतील रुग्णसंख्या वाढत चालली आहे. सौम्य लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांना घरीच आयसोलेशनचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला असून त्यांना त्यानुसार औषधे दिली जात आहेत. गंभीर लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांना आधी दाखल करुन घेतले जात असून त्यांच्यावर तात्काळ उपचार केले जात आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special ReportDonald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget