एक्स्प्लोर
डोंबिवली स्फोट: जखमींवर मोफत उपचाराचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन हवेत विरलं!
डोंबिवली (मुंबई) : डोंबिवली एमआयडीसीत 26 मे रोजी झालेल्या दुर्घटनेनंतर माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार घडला आहे. प्रोबेस या कंपनीत स्फोटात जखमी झालेल्यांना खासगी हॉस्पिटल्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्याकडून आता डिस्चार्जच्या नावाखाली लाखो रुपयांची मागणी करण्यात आली आहे.
या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जखमींवर उपचार सुरु असलेल्या हॉस्पिटलनाही भेटी दिल्या आणि उपचाराचा खर्च सरकारकडून केला जाईल, असं आश्वासनही दिलं. मात्र, प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. जखमींकडून उपचाराच्या नावाखाली लाखो रुपयांची मागणी केली जाते आहे.
प्रकरण 1 : लाखो आणायचे कुठून? स्नेहाच्या पालकांचा सवाल
डोंबिवली एम्स हॉस्पिटलमध्ये स्नेहा मोरे नावाची तरुणी उपचार घेत आहे. दोन महिन्यांपूर्वीच स्नेहा प्रोबेस कंपणीच्या बाजूला असलेल्या फाईन केमिकल्स या कंपनीत कामाला लागली होती. 26 मे रोजीच्या दुर्घटनेत स्नेहाच्या डोळ्यांना गंभीर इजा झाली. शिवाय, शरीरावर अनेक जख्मा झाल्या आहेत.
दोन ते तीन दिवस झाले स्नेहावर एम्स हॉस्पिटलचे डॉक्टर उपचार करत होते. पण आता दीड लाख रुपये डिपॉझिट केल्यावरच पुढील उपचार केले जातील असं हॉस्पिटलने सांगतिलं आहे. त्यामुळे स्नेहाच्या पालकांवर मोठं संकट कोसळलं आहे. एकीकडे तरुण मुलीच्या लग्नाच्या चिंतेने त्यांना झोप लागत नाही, तर दुसरीकडे उपचारासाठी 2 ते 3 लाख रुपये आणायचे कुठून, या विचाराने त्यांना आता जेवणही जात नाही.
प्रोबेस कंपनीच्या स्फोटात जखमी झालेल्यांना डोंबिवलीतील एम्स, आयकॉन आणि शिवम हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. एम्स हॉस्पिटलसारखी आयकॉन आणि शिवम हॉस्पिटलमधील जखमींकडे पैसे मागितले गेल्याचे समोर आले आहे.
प्रकरण 2 : तहसीलदारांच्या हस्तक्षेपानंतर वाल्मिकी यादववर उपचार
आयकॉन हॉस्पिटलने तर माणूसकी सोडून जखमींच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे. वाल्मिकी यादव नावाच्या जखमीवर तीन दिवस उपचार केले नव्हते. शेवटी तहसिलदारांकडे तक्रार केल्यावर आयकॉन हालचाल केली.
प्रकरण 3 : आयकॉन हॉस्पिटलचा मुजोरीपणा
ओंकार मांढरे नावाच्या विद्यार्थ्याला चेहऱ्यावर काच लागली होती. त्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. जखम इतकी मोठी होती की, 7 ते 8 टाके घालायचे सोडून, चार टाके घालून आयकॉन हॉस्पिलच्या डॉक्टरांनी ओंकारला तासाभरात घरी सोडून दिले. दुसऱ्या दिवशी ओंकारला उपचाराकरिता पुन्हा आयकॉनमध्ये नेण्यात आले, तेव्हा त्यांनी फॅमिली डॉक्टरकडे उपचार घेण्याचा सल्ला दिल.
जखमींवर मोफत उपचार करु, असं आश्वासन देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले. मात्र, प्रत्यक्षात हॉस्पिटलमध्ये जखमींकडून लाखो रुपयांची मागणी केली जात आहे. आता याकडे मुख्यमंत्री गांभीर्याने लक्ष देणार आहेत का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement