एक्स्प्लोर

Pune Municipal Corporation | पुणे महापालिकेच्या अत्यावश्यक सेवा देणाऱ्या नंबरवर हायकोर्टातून थेट कॉल, पुढे काय झालं?

पुणे महापालिकेच्या वेबसाईटवर दिलेली माहिती दिशाभूल करणारी असल्याचा आरोप करत मुंबईत हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टानं प्रत्यक्षात फोन लावूनच स्थिती जाणून घेतली.

मुंबई : पुणे महापालिकेच्या वेबसाईटवर दिलेली माहिती दिशाभूल करणारी असल्याचा आरोप करत मुंबईत हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर वाईट व्यवस्थापना बाबतीत पुणे महापालिकेच्या अत्यावश्यक सेवा देणाऱ्या नंबरवर हायकोर्टानं कोर्टातून थेट कॉल लावला. तर वेबसाईटवर पाच व्हेंटिलेटर बेड असूनही, हेल्पलाईनवरील महिलेनं बेड उपलब्ध नसल्याचं फोनवर सांगितलं. 

पुणे महापालिकेचं व्यवस्थापन कोर्टात उघड पडल्याने अश्या पद्धतीनं फोनकरून खातरजमा करणं योग्य नाही. हेल्पलाईनवर काम करणारी व्यक्ती डॉक्टर नसते, अशी पुणे महापालिकेने हायकोर्टात सारवासारव केली. दरम्यान महापालिकेने सर्व फोन ऑपरेटर्सना ट्रेनिंग देणार असल्याचं कोर्टात सांगितलं आहे. त्यावर मुख्य न्यायाधीश सीजे दत्ता म्हणाले की पुढच्या वेळीही फोन लावून अशीच खातरजमा करु. 

लोकसंख्येच्या तुलनेत पुणे सर्वाधिक कोरोना चाचण्या करणारं शहर आहे. शहरात 40 लाख लोकसंख्येपैकी 22 लाख लोकांच्या कोरोना चाचण्या केल्याची पालिकेची माहिती. पुण्यात आजवर कोरोनामुळे 7300 जणांचा मृत्यू झाल्याचही पालिकेने सांगितलं आहे.

पुण्यातील रुग्णसंख्येचा आलेख उतरणीला
पुणे जिल्हा काही दिवसांपूर्वी केवळ राज्यच नव्हे तर संपूर्ण देशासाठी कोरोनाचा हॉटस्पॉट बनला होता. मात्र, महाराष्ट्रातील इतर शहरांप्रमाणे पुण्यातील कोरोना रुग्णांचा आलेखही उतरणीला लागला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून पुणे जिल्हा सावरल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच पुण्यात निर्बंध लागू करण्यात आले होते. या निर्बंधांमुळे कोरोना रुग्णांचा आलेख आधीपासून स्थिरावण्यास सुरुवात झाली होती. आता मात्र पुण्यातील रुग्णसंख्येत कमालीची घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

1 मे रोजी पुणे जिल्ह्यात अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 96811 इतकी होती. त्यापैकी 28946 रुग्णालयात उपचार घेत होते, तर 67865 रुग्ण होम क्वॉरंटाईन होते. पण त्यानंतर 10 दिवसांनी म्हणजेच, 10 मे रोजी पुण्यात कोरोनाचे 91950 रुग्ण होते. त्यापैकी 28189 रुग्ण रुग्णालयात तर, 63761 रुग्ण होम क्वॉरंटाईन होते. 

मुंबई पाठोपाठ महाराष्ट्रातील मोठ्या शहरांच्या यादीत समावेश होणाऱ्या पुण्याचीही अॅक्टिव्ह रुग्णसंख्या कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. कठोर निर्बंध, कोरोना नियमांची अंमलबजावणी आणि काटेकोर नियोजनामुळे पुण्याचा चढता आलेख उतरणीला लागला आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08 PM 19 January 2024Sachin Tendulkar Interview at Wankhede Stadium : वानखेडेचा सुवर्णमहोत्सव, सचिन तेंडुलकर EXCLUSIVEJOB Majha : डीकेटेड  फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि.मध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागाABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget