एक्स्प्लोर

साकिनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी मोहन चौहान दोषी सिद्ध

Dindoshi sessions court : 10 सप्टेंबर 2021 रोजी आरोपीनं एका 30 वर्षीय महिलेची बलात्कारनंतर निर्घृणपणे हल्ला केला होता

Dindoshi sessions court : अंधेरीतील साकीनाका परिसरात एका महिलेवर बलात्कारकरून तिची निर्घृणपणे हत्या केल्याच्या प्रकरणातील आरोपी मोहन चौहानला (45) दिंडोशी सत्र न्यायालयानं सोमवारी मोहन चौहान दोषी सिद्ध केलं आहे. येत्या बुधवारी मोहनला काय शिक्षा द्यायची यावर युक्तिवाद केला जाणार आहे.

गेल्यावर्षी ऐन गणेशोत्सवात मुंबईतील साकीनाका परिसरात घडलेल्या या घटनेनं संपूर्ण मुंबई हादरली होती. 10 सप्टेंबर 2021 च्या मध्यरात्री एक 32 वर्षीय महिला रस्त्यावर रक्तबंबाळ अवस्थेत जखमी आढळून आली. तिला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचं स्पष्ट झालं. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही 11 सप्टेंबर रोजी तिने आपले प्राण सोडले. या घटनेनंतर काही तासांच्याआतच मुंबई पोलिसांकडून आरोपी मोहन चौहानला अटक करण्यात आली होती. मोहनवर भारतीय दंड संहितेच्या विविध  कलमांतर्गत बलात्कार, हत्या, एट्रोसिटी, जाणीवपूर्वक गंभीर मारहाण यासह हत्यार कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. अवघ्या 18 दिवसांत मुंबई पोलिसांकडून याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं

346 पानांच्या या आरोपपत्रात काही गोष्टी स्पष्ट झाल्या होत्या. पीडित महिला ही आरोपीला आधीपासूनच ओळख होती. गुन्हा घडला त्याच्या 25 दिवस आधीही आरोपीनं महिलेला भेटण्याचा आणि संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तो होऊ शकला नाही. त्यामुळे बऱ्याच कालावधीनंतर ती त्याला भेटली तेव्हा रागाच्या भरात नराधमाने तिच्यासोबत अमानुष कृत्य केले. ज्यात लोखंडी सळीच्या सहाय्यानं त्यानं त्या महिलेची आतडी बाहेर काढली होती. हे कृत्य पूर्वनियोजित नव्हते असा निष्कर्ष काढत पोलिसांनी हा तपास तातडीनं पूर्ण केला. या आरोपपत्रात एकूण 37 जणांचे जबाब नोंदवले असून एट्रोसिटी, बलात्कार आणि हत्या प्रकरणात वैद्यकीय, भौतिक आणि रासायनिक असे सर्व पुरावे जमा करून तपास पूर्ण करण्यात आल्याचं पोलिसांच्या या आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे. त्याच आधारावर आरोपी मोहन चौहानला दोषी सिद्ध करत असल्याचं सोमवारी मुंबईतील दिंडोशी सत्र न्यायालयाने स्पष्ट केले असून येत्या 1 जूनला मोहनला शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : स्वत:ला हिंदू म्हणवणारे हिंसा हिंसा, नफरत नफरत करतात, राहुल गांधी यांचं वक्तव्य,मोदी म्हणाले हे गंभीर....
राहुल गांधी यांचं एक वक्तव्य अन् लोकसभेत सत्ताधारी विरोधक आक्रमक, मोदींनी म्हटलं हे गंभीर
दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगच्या विरोधात नागरिकांचा आक्रमक पवित्रा; विकासकामाला स्थगिती, मात्र नेमका वाद काय?
दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगच्या विरोधात नागरिकांचा आक्रमक पवित्रा; विकासकामाला स्थगिती, मात्र नेमका वाद काय?
तोच दिवस, तीच पद्धत... 6 वर्षांनी दिल्लीतील बुराडीप्रमाणेच मध्य प्रदेशात हादरवणारं दृश्य, आढळले 5 मृतदेह
तोच दिवस, तीच पद्धत... 6 वर्षांनी दिल्लीतील बुराडीप्रमाणेच घरात आढळले लटकलेले संपूर्ण कुटुंबाचे मृतदेह
Zika Virus:  पुण्यात झिकाचा धोका वाढला, एरंडवणेतील गर्भवती महिलेला झिकाचा संसर्ग
पुण्यात झिकाचा धोका वाढला, एरंडवणेतील गर्भवती महिलेला झिकाचा संसर्ग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sachin kharat On Deekshabhoomi :  दीक्षाभूमीत अंडरग्राऊंड पार्किंग होणं अत्यंत चुकीचं : सचिन खरातAmbadas Danve : लोकशाहीचा गळा सातत्याने घोटला जातोयKolhapur Ports Water Level : कोल्हापूरच्या शिंगणापूर बंधाऱ्यावरुन धोकादायक पद्धतीने वाहतूकVidhansabha Diary : आतापर्यंतच्या विधानसभा अधिवेशनातील घडामोडी : 1 जुलै 2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : स्वत:ला हिंदू म्हणवणारे हिंसा हिंसा, नफरत नफरत करतात, राहुल गांधी यांचं वक्तव्य,मोदी म्हणाले हे गंभीर....
राहुल गांधी यांचं एक वक्तव्य अन् लोकसभेत सत्ताधारी विरोधक आक्रमक, मोदींनी म्हटलं हे गंभीर
दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगच्या विरोधात नागरिकांचा आक्रमक पवित्रा; विकासकामाला स्थगिती, मात्र नेमका वाद काय?
दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगच्या विरोधात नागरिकांचा आक्रमक पवित्रा; विकासकामाला स्थगिती, मात्र नेमका वाद काय?
तोच दिवस, तीच पद्धत... 6 वर्षांनी दिल्लीतील बुराडीप्रमाणेच मध्य प्रदेशात हादरवणारं दृश्य, आढळले 5 मृतदेह
तोच दिवस, तीच पद्धत... 6 वर्षांनी दिल्लीतील बुराडीप्रमाणेच घरात आढळले लटकलेले संपूर्ण कुटुंबाचे मृतदेह
Zika Virus:  पुण्यात झिकाचा धोका वाढला, एरंडवणेतील गर्भवती महिलेला झिकाचा संसर्ग
पुण्यात झिकाचा धोका वाढला, एरंडवणेतील गर्भवती महिलेला झिकाचा संसर्ग
Telly Masala : टीम इंडियासाठी आयुष्यमानची खास कविता ते शालूचं जमलं? राजेश्वरीच्या रिलेशनशीपची चर्चा ; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
टीम इंडियासाठी आयुष्यमानची खास कविता ते शालूचं जमलं? राजेश्वरीच्या रिलेशनशीपची चर्चा ; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
OTT Release Week :  जुलैच्या पहिल्या आठवड्यात ओटीटीवर क्राईम-थ्रिलरचा धडाका, 'हे' वेब सीरिज-चित्रपट होणार रिलीज
जुलैच्या पहिल्या आठवड्यात ओटीटीवर क्राईम-थ्रिलरचा धडाका, 'हे' वेब सीरिज-चित्रपट होणार रिलीज
Babn Gite: लोकसभेला बोगस बुथ शोधले, विधानसभेला अडचण होऊ नये म्हणून बबन गीतेंना अडकवण्याचा प्रयत्न: जितेंद्र आव्हाड
लोकसभेला बोगस बुथ शोधले, विधानसभेला अडचण होऊ नये म्हणून बबन गीतेंना अडकवण्याचा प्रयत्न: जितेंद्र आव्हाड
मोदी साहब... मल्लिकार्जुन खर्गेंनी राज्यसभेत हात जोडून मागितली पंतप्रधान मोदींची माफी; नेमकं काय घडलं?
मोदी साहब... मल्लिकार्जुन खर्गेंनी राज्यसभेत हात जोडून मागितली पंतप्रधान मोदींची माफी; नेमकं काय घडलं?
Embed widget