Mumbai News : शाळेनं विद्यार्थ्यांनाच नाही तर थेट पालकांनाही नाचवलं, हा अनोखा उपक्रम नेमका काय?
Mumbai News : डिजिटल डिटॉक्स दिनानिमित्त कांदिवलीच्या ठाकुर कॉम्प्लेक्समधील चिल्ड्रन एकॅडमी शाळेत कार्यशाळा राबवण्यात आली.
मुंबई : कांदिवलीच्या (Kandivali) ठाकुर कॉम्प्लेक्समधील चिल्ड्रन अकॅडमी शाळेत डिजिटल डिटॉक्ससाठी (Digital Ditox) एक कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी मोबाईल बाजूला ठेवून पालक आणि मुलांनी शाळेत एकत्र छानसा वेळ घालवला. यावेळी विद्यार्थ्यांसह पालकांना देखील नाचण्यास प्रोत्साहन केलं. या कार्यशाळेच्या दरम्यान विविध खेळ आणि इतर काही अॅक्टिव्हीटी देखील घेण्यात आल्या. या शाळेच्या या स्तुत्य उपक्रमाचे सध्या सगळीकडे कौतुक केले जात आहे.
दरम्यान वाढत्या डिजिटल जगात स्वतःला आराम देण्यासाठी काहीतरी वेगळं करत राहण्याची गरज असते. सध्या डिजिटल युग सुरू आहे. दररोज नवनवीन गॅझेट्स आपल्याला अधिक आरामदायक बनवत आहेत. त्यामुळे शारीरिक हालचाली कमी होताना दिसत आहेत.या डिजिटल उपकरणांचे अनेक फायदे आहेत आणि कमी तोटेही नाहीत. त्यामुळे अनेक प्रकारच्या मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात. याचसाठी रविवार (1 ऑक्टोबर) रोजी डिजिटल डिटॉक्स दिन साजरा केला जातो.
शाळेचा स्तुत्य उपक्रम
डिजिटल डिटॉक्स दिनाच्या निमित्ताने ठाकुर कॉम्प्लेक्समधील शाळेने पालकांसह विद्यार्थ्यांना देखील शाळेत बोलावून घेतलं. तसेच त्यांना मोबाईल वाजूला सारुन विविध अॅक्टीव्हिटी करण्यास प्रोत्साहन दिलं. तसेच यावेळी पालकांनी देखील समाधान व्यक्त केलं. यामुळे विद्यार्थ्यांना देखील प्रोत्साहन मिळाल्याचं पालकांचं म्हणणं आहे.
डिजिटल डिटॉक्स दिवस
डिजिटल डिटॉक्सच्या काळामध्ये व्यक्ती स्मार्टफोन , संगणक आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सपासून पूर्णत: लांब राहते. या काळामध्ये कोणत्याही प्रकाचे डिजीटल उपकरण वापरले जात नाही. त्याचमुळे डिजिटल डिटॉक्स दिन साजरा केला जातो. यामुळे तो एक दिवस लोकं डिजिटल उपकणांपासून वेगळं राहण्यास प्रोत्साहन मिळतं. तर विविध ठिकाणी याच दिवसाचे औचित्य साधून वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येतात.