Dhravya Shah : केवळ 19 वर्षांचा मुंबईकर ध्रव्य शाह बनला सीईओ! सुपरमेममरी AI स्टार्टअपसाठी 30 लाख डॉलर्सचे फंडिंग
Supermemory AI Startup : मुंबईत जन्मलेला आणि वाढलेला ध्रव्य शाह लहानपणापासूनच तंत्रज्ञान आणि कोडिंगच्या जगाशी जोडलेला होता. अमेरिकेत गेल्यानंतर त्याने ‘सुपरमेमरी’ या स्टार्टअपची सुरुवात केली.

मुंबई: मुंबईकर असलेल्या 19 वर्षीय ध्रव्य शाहने (Dhravya Shah) अशी कामगिरी केली आहे की जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्राचे लक्ष त्याच्याकडे वेधले गेले आहे. ध्रव्य हा ‘सुपरमेमरी’ (Supermemory) नावाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) स्टार्टअपचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहे. एवढ्या कमी वयात त्याने आपल्या स्टार्टअपसाठी तब्बल 30 लाख डॉलर इतका निधी मिळवला आहे. विशेष म्हणजे, या फंडिंगला गूगलचे एआय प्रमुख जेफ डीन आणि डीपमाइंडचे लोगन किलपॅट्रिक यांसारख्या दिग्गजांचा पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे ध्रव्य शाह आज तंत्रज्ञान जगतात नवा प्रेरणास्रोत ठरला आहे.
Supermemory AI Startup : एआयची मेमरी कमी, ‘सुपरमेमरी’ देणार उपाय
सुपरमेमरी या स्टार्टअपचे ध्येय एआय प्रणालीतील दीर्घकालीन मेमरीच्या अभावावर मात करणे आहे. सध्या मोठे भाषा मॉडेल्स (Large Language Models – LLMs) प्रचंड माहितीवर कार्यरत असले तरी, ती माहिती दीर्घकाळ लक्षात ठेवण्यात त्यांना अडचण येते.
ध्रव्यच्या ‘सुपरमेमरी’ तंत्रज्ञानामुळे एआय अॅप्लिकेशन्स पूर्वीचे सत्रातील माहिती पुन्हा वापरू शकतील. ही तंत्रज्ञान यशस्वी ठरल्यास डिजिटल प्रणालींच्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल घडवू शकते आणि वापरकर्त्यांचा अनुभव अधिक परिणामकारक बनवू शकते.
Dhruvya Shah Journey : मुंबई ते अमेरिकेपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
मुंबईत जन्मलेला आणि वाढलेला ध्रव्य शाह लहानपणापासूनच तंत्रज्ञान आणि कोडिंगच्या जगाशी जोडलेला होता. त्याचे मित्र आयआयटी प्रवेश परीक्षेची तयारी करत असताना ध्रव्यने कोडिंगमध्ये स्वतःला झोकून दिले. त्याने ट्विटर ऑटोमेशन टूल तयार केले आणि नंतर ते ‘हायपफ्यूरी’ या प्लॅटफॉर्मला विकले. अमेरिकेत गेल्यानंतर त्याने 40 आठवड्यांत 40 प्रोजेक्ट्स तयार करण्याची आव्हानात्मक योजना आखली. याच प्रयोगातून ‘सुपरमेमरी’ या स्टार्टअपची सुरुवात झाली.
Dhruvya Shah AI Start Up : एआय तज्ज्ञ म्हणून प्रगती
ध्रव्यने ‘हायपफ्यूरी’मध्ये फुल-स्टॅक डेव्हलपर म्हणून काम केले. त्यानंतर तो एआय इंजिनिअर बनला. नंतरच्या काळात तो क्लाउडफ्लेअर (Cloudflare) मध्ये डेव्हलपर रिलेशन्स लीड म्हणून कार्यरत होता. क्लाउडफ्लेअरमध्ये काम करताना त्याला एआय इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेटा सिस्टीम्सची सखोल समज मिळाली. क्लाउडफ्लेअरचे सीटीओ डेन कनेच यांच्या प्रेरणेने त्याने स्वतःचा एआय स्टार्टअप उभारण्याचा निर्णय घेतला आणि तिथूनच ‘सुपरमेमरी’चा जन्म झाला.
ही बातमी वाचा:
























