एक्स्प्लोर
Advertisement
पंकजा मुंडेंकडून जलसंधारण खातं जाण्याची शक्यता, सुत्रांची माहिती
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय मंत्रिमंडळात अनेकांना धक्का दिला. तेच धक्कातंत्र देवेंद्र फडणवीस राज्यात वापरण्याची शक्यता आहे. 'माझा'ला मिळालेल्या माहितीनुसार कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडील जलसंधारण विभाग काढून घेतला जाण्याची शक्यता आहे.
अतिरिक्त भार असल्याचं कारण देत जलसंधारण मंत्रालयाची धुरा संभाजी पाटील निलंगेकरांच्या खांद्यावर दिली जाण्याची शक्यता आहे. खरं तर गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात जलयुक्त शिवाराची कामं झाली. त्याचे परिणाम आता दिसायला लागले. त्यातच पंकजा मुंडेंचं खातं काढून घेतलं जाणार असल्यानं त्यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातो आहे.
केंद्रात नरेंद्र मोदींनी स्मृती इराणींचं मनुष्यबळ विकास मंत्रालय काढून त्यांना वस्त्रोद्योगाची जबाबदारी दिली. तर राज्यात पंकजा मुंडेंचा पदभार कमी होण्याची शक्यता आहे.
याशिवाय एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेलं महसूलमंत्रिपद चंद्रकांत पाटील यांना मिळण्याची शक्यता आहे. महादेव जानकर यांना पशुसंवर्धन आणि दुग्धविकास, सुभाष देखमुखांना सहकार तर पांडुरंग फुंडकर यांना कृषी मंत्रालय मिळण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement