एक्स्प्लोर

मोठी बातमी! आपले सरकार पोर्टवरील सेवा देताना दिरंगाई केल्यास विभागप्रमुखांना दरदिवशी 1000 रुपये दंड

राज्य शासनाने सेवा हक्क अधिनियमांतर्गत 1027 सेवा अधिसूचित केल्या असून त्यापैकी 527 सेवा ‘आपले सरकार’ पोर्टलवर उपलब्ध आहेत. 

मुंबई : सर्वसामान्य नागरिकांना शासकीय सेवा बसल्या जागी पुरविण्यासाठी आणि सरकारी कार्यालयातील येणाऱ्या अडचणींच्या तक्रारी करण्यासाठी सरकारने आपले सरकार पोर्टल व मोबाईल अॅप ही सेवा सुरू केली आहे.  अनेकदा या पोर्टलवरुन सेवा उपलब्ध करताना किंवा तक्रारीचा निपटारा करताना प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून दिरंगाई केली जाते. आता, आपले सरकार पोर्टलवर (Aple sarkar) अधिसूचित सेवा उपलब्ध करण्यात दिरंगाई करणाऱ्या प्रशासकीय विभाग प्रमुखांना दरदिवशी 1 हजार रुपयांचा दंड लावण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याबाबतचे निर्देश दिले आहेत. राज्य शासनाने सेवा हक्क अधिनियमांतर्गत 1027 सेवा अधिसूचित केल्या असून त्यापैकी 527 सेवा ‘आपले सरकार’ पोर्टलवर उपलब्ध आहेत. 

प्रशासकीय विभागांनी त्यांच्या सर्व अधिसूचित सेवा पोर्टलवर उपलब्ध करून द्याव्यात. यात दिरंगाई करणाऱ्या प्रशासकीय विभाग प्रमुखाला दरदिवशी 1 हजार रुपयांचा दंड लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिल्या आहेत. त्यामुळे, आपलं सरकार पोर्टवरील शासकीय सेवा अधिक गतीमान होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात विविध सामाजिक क्षेत्रांची वॉररुम बैठक आज संपन्न झाली. त्यामध्ये, सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या आपलं सरकार पोर्टलच्या तक्रारी आणि त्यावर होत असलेल्या कारवाईच्या अनुषंगाने देखील चर्चा झाली. 

या बैठकीत आदिवासी विकास विभागाच्या विविध योजना, आपले सरकार पोर्टलवरील अधिसूचित सेवा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे कार्यान्वयन, अॅग्रीस्टॅक उपक्रम यांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. आपले सरकार पोर्टलवर विविध विभागांच्या 138 इंटिग्रेटेड सेवा 31 मे 2025 पर्यंत उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी सचिवांना दिल्या. तसेच उर्वरित 306 अधिसूचित सेवा 15 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन कराव्यात. त्याप्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या कालावधीत ऑनलाईन सेवा उपलब्ध करण्यास दिरंगाई करणाऱ्या प्रशासकीय विभाग प्रमुखांवर दरदिवशी 1 हजार रुपयांचा दंड लावण्याची कारवाई करण्यात यावी, असे निर्देशच मुख्यमंत्र्यांनी सचिवांना दिले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या निर्देशामुळे आता प्रशासन अधिक गतीमान होऊन नागरिकांच्या स्थानिक विभागासंदर्भातील तक्रारींचा लवकरात लवकर निपटारा होण्यास मदत मिळणार आहे. 

काय आहे आपले सरकार

'आपले सरकार' हा महाराष्ट्र, सरकारचा एक उपक्रम आहे, ज्याचा उद्देश नागरिकांना अधिक कार्यक्षमतेने आणि पारदर्शकपणे विविध सरकारी सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देणे आहे. आपले सरकार पोर्टलद्वारे, नागरिक प्रमाणपत्रे, परवाने, आणि इतर विविध प्रकारच्या सेवांसाठी अर्ज करू शकतात. त्यात तक्रार निवारण यंत्रणा देखील समाविष्ट आहे, जिथे लोक सरकारी कार्यालयासंदर्भात तक्रारी किंवा त्यांना सरकारी सेवांबाबत भेडसावणाऱ्या समस्या नोंदवू शकतात. प्रशासनाला नागरिकांच्या जवळ आणण्यासाठी आणि सरकारी कार्यालयांना प्रत्यक्ष भेटी देण्याची गरज कमी करण्यासाठी या पोर्टलला बनवण्यात आले आहे. मोबाईल अॅप आणि पोर्टलद्वारे ही सेवा कार्यरत आहे. 

हेही वाचा

सॅल्यूट! SP साहेबांनी गाडी थांबवली, आजीच्या चप्पला उचलल्या; पोलिसांना निर्देश देत रुग्णालयात पोहोचवलं

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sangli Crime: सांगलीत दलित महासंघाच्या उत्तम मोहितेंना वाढदिनीच संपवलं; आरोपींचा पाठलाग करून मुसक्या आवळल्या
सांगलीत दलित महासंघाच्या उत्तम मोहितेंना वाढदिनीच संपवलं; आरोपींचा पाठलाग करून मुसक्या आवळल्या
Share Market Update : भारतीय शेअर बाजारात 'या' पाच कारणांमुळं तेजी, सेन्सेक्स 600 अंकांनी वधारला, निफ्टी 26 हजारांच्या पार, मार्केट बंद होताना चित्र बदललं
भारतीय शेअर बाजारात 'या' पाच कारणांमुळं तेजी, सेन्सक्स अन् निफ्टीमध्ये तेजीनंतर पुन्हा चित्र बदललं
34 वय झालंय तरी लग्न जुळना, शरद पवारांना पत्र लिहिणारा मंगेश काय म्हणतो, शिक्षण किती, काय करतो?
34 वय झालंय तरी लग्न जुळना, शरद पवारांना पत्र लिहिणारा मंगेश काय म्हणतो, शिक्षण किती, काय करतो?
छत्रपती संभाजीनगरमध्ये एटीएसची मोठी कारवाई; गाझा मदतीच्या नावाखाली फसवणुकीचा पर्दाफाश!
छत्रपती संभाजीनगरमध्ये एटीएसची मोठी कारवाई; गाझा मदतीच्या नावाखाली फसवणुकीचा पर्दाफाश!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pimpri Chinchwad NCP : पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर लवकरच शिक्कामोर्तब
Ambadas Danve on Ajit Pawar : अजित पवार सरकारमधून बाहेर पडणार होते, अंबादास दानवेंचा दावा
Shivaji Sawant BJP : शिवाजी सावंत यांचा भाजप प्रवेश का रखडला? कारण काय? ABP Majha
Gold Rate Hike : सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, तीन दिवसात 5 हजारांनी वाढलं
Ahilyanagar Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात 5 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, मृतदेह सापडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Crime: सांगलीत दलित महासंघाच्या उत्तम मोहितेंना वाढदिनीच संपवलं; आरोपींचा पाठलाग करून मुसक्या आवळल्या
सांगलीत दलित महासंघाच्या उत्तम मोहितेंना वाढदिनीच संपवलं; आरोपींचा पाठलाग करून मुसक्या आवळल्या
Share Market Update : भारतीय शेअर बाजारात 'या' पाच कारणांमुळं तेजी, सेन्सेक्स 600 अंकांनी वधारला, निफ्टी 26 हजारांच्या पार, मार्केट बंद होताना चित्र बदललं
भारतीय शेअर बाजारात 'या' पाच कारणांमुळं तेजी, सेन्सक्स अन् निफ्टीमध्ये तेजीनंतर पुन्हा चित्र बदललं
34 वय झालंय तरी लग्न जुळना, शरद पवारांना पत्र लिहिणारा मंगेश काय म्हणतो, शिक्षण किती, काय करतो?
34 वय झालंय तरी लग्न जुळना, शरद पवारांना पत्र लिहिणारा मंगेश काय म्हणतो, शिक्षण किती, काय करतो?
छत्रपती संभाजीनगरमध्ये एटीएसची मोठी कारवाई; गाझा मदतीच्या नावाखाली फसवणुकीचा पर्दाफाश!
छत्रपती संभाजीनगरमध्ये एटीएसची मोठी कारवाई; गाझा मदतीच्या नावाखाली फसवणुकीचा पर्दाफाश!
न्यायमूर्तींच्या बदल्या ते अण्वस्त्रांची कमान! पाकिस्तानात थेट संविधानाला सुरुंग, तब्बल 48 कायद्यात एका झटक्यात बदल; लष्करप्रमुख असीम मुनीरांना किती मोठी ताकद दिली?
न्यायमूर्तींच्या बदल्या ते अण्वस्त्रांची कमान! पाकिस्तानात थेट संविधानाला सुरुंग, तब्बल 48 कायद्यात एका झटक्यात बदल; लष्करप्रमुख असीम मुनीरांना किती मोठी ताकद दिली?
हायकोर्टाचा घटस्फोटीत पतीला दणका; पोटगीची रक्कम 7 पटीने वाढवली, दरमहा 3.5 लाख देण्याचे निर्देश
हायकोर्टाचा घटस्फोटीत पतीला दणका; पोटगीची रक्कम 7 पटीने वाढवली, दरमहा 3.5 लाख देण्याचे निर्देश
Rupali Patil Thombare: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिस्तभंगाच्या नोटीसला रुपाली ठोंबरेंनी उत्तर दिलं, म्हणाल्या, 'मी महिला आयोगाच्या...'
राष्ट्रवादीच्या शिस्तभंगाच्या नोटीसला रुपाली ठोंबरेंनी उत्तर दिलं, म्हणाल्या, 'मी महिला आयोगाच्या...'
तुमच्या मुलाच्या बाबतीत कट रचला असता तर..; मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवरुन अजित पवारांना सवाल
तुमच्या मुलाच्या बाबतीत कट रचला असता तर..; मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवरुन अजित पवारांना सवाल
Embed widget