एक्स्प्लोर

मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपकडून तीन नावे समोर, उपमहापौरपदी शिवसेनेतील दोन महिलांच्या नावांची चर्चा

मुंबई महापालिकेची निवडणूक बिनविरोध होणार का? अशी चर्चा दुसरीकडे होत आहे. मात्र, ठाकरेंची शिवसेना महापौर आणि उपमहापौर पदाचा उमेदवार देणार असल्याचे कळतंय.

मुंबई : राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिका (Mumbai) निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईत महापौर (Mayor) कोणाचा, उपमहापौर कोणाचा, आणि स्थायी समिती अध्यक्ष कोणाचा या सगळ्या विषयाचा तिढा जवळपास सुटलेला आहे. यासंदर्भात शेवटची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज उद्यामध्ये होईल आणि नावही अंतिम होईल. त्यामध्ये भाजपकडून (BJP) महापौरपदासाठी राजश्री शिरवळकर, रितू तावडे आणि  शितल गंभीर या तीन नावांची चर्चा आहे. तर शिवसेना शिंदे यांच्या मिळणाऱ्या उपमहापौर पदासाठी तृष्णा विश्वासराव आणि यामिनी जाधव या दोन नावांची चर्चा आहे. विशेष म्हणजे, स्थायी समिती अध्यक्ष पद हे सुद्धा भाजपकडे राहणार असल्याची माहिती आहे. मुंबई महापालिकेला सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे, महिलेकडेच मुंबईची धुरा असणार आहे. 

मुंबई महापालिकेची निवडणूक बिनविरोध होणार का? अशी चर्चा दुसरीकडे होत आहे. मात्र, ठाकरेंची शिवसेना महापौर आणि उपमहापौर पदाचा उमेदवार देणार असल्याचे कळतंय. यासंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनीही सूचक वक्तव्य केलं आहे. त्यानुसार, आमची माणसं कामाला लागली आहेत, असे आदित्य यांनी म्हटलंय. त्यामुळे, 7 फेब्रुवारीला महापौर पदाच्या उमेदवारीसाठी ठाकरेंची शिवसेना अर्ज भरण्याची शक्यता आहे. बहुमत नसलं तरी ठाकरेंची शिवसेना आपला उमेदवार रिंगणात उतरवेल. भाजपचे 89, शिंदे शिवसेनेचे 29, आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तीन असे 121 संख्याबळ महायुतीकडे आहे. त्यामुळे भाजपचा महापौर निवडून येण्यास कुठलीही अडचण येणार नाही हे स्पष्ट चित्र आहे. 

स्थायी समितीचं गणित कसं?

स्थायी समितीमध्ये लागलेल्या निकालानंतरची आकडेवारी बघता सदस्यांची संख्या विरोधकांची 13 आणि सत्ताधाऱ्यांची 13 होत होती. त्यामुळे स्थायी समितीमध्ये आपली ताकद वाढण्याची दृष्टिकोनातून शिंदे शिवसेना आणि भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची मदत घ्यायचं ठरवलं आहे. शिंदे शिवसेना पक्षाने आपली गट नोंदणी केली असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सहयोगी गट म्हणून गट नोंदणी करण्याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, स्वीकृत नगरसेवकाची अट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने ठेवल्याने चर्चा पुढे जात नसल्याचं कळतंय. 

खर तर मुंबई महापालिकेचा निकाल जाहीर होऊन जवळपास तीन आठवडे झाले. मात्र, चर्चेचं गुराळ अजूनही संपलेलं नाही. आधी महापौर आरक्षण, नंतर संयुक्त गटावर चर्चा सुरू आहे. अजित पवारांचे निधन आणि त्यानंतर महापौर पदाचा अंतिम निर्णय, यामुळे बराचसा वेळ मुंबई महापालिका निवडणुकीनंतर महापौर बसवण्यामध्ये गेला आहे. आता,  11 फेब्रुवारीला अखेर मुंबई महापालिकेचा महापौर ठरणार आहे. मात्र, तो कोण असेल, ती महिला कोण असेल याचीच वाट सर्वजण पाहात आहेत.

हेही वाचा

काँग्रेस, मोदी की कब्र खोदने के सपने देखती है; राज्यसभेतून मोदींचा घणाघात, नेहरू, इंदिरा गांधींचाही उल्लेख

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain: पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Ashram School Student Deaths: आदिवासी आश्रमशाळा की 'मृत्यूचा सापळा'? दोन वर्षांत राज्यात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर
आदिवासी आश्रमशाळा की 'मृत्यूचा सापळा'? दोन वर्षांत राज्यात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर
Mumbai Taj Lands End vs BMC: ताज लँड्स एंडच्या टॅक्सवरून BMC-Tata पुन्हा आमने-सामने; ताज लँड्स एंडवर BMCचा 103 कोटींचा दंड, नेमकं प्रकरण काय?
ताज लँड्स एंडच्या टॅक्सवरून BMC-Tata पुन्हा आमने-सामने; ताज लँड्स एंडवर BMCचा 103 कोटींचा दंड, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
Embed widget