एक्स्प्लोर

'मातोश्री'वर फडणवीस-ठाकरे भेट, युतीबाबत सकारात्मकता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्वव ठाकरेंना भेटायला मातोश्रीवर गेले होते. काही करून सेना भाजप युतीचा मार्ग मोकळा करा, अमित शाहांकडून महाराष्ट्र भाजपला अल्टीमेटम दिला गेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री स्वतः उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेले.

मुंबई :  लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात शिवसेनेसोबत युतीसाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्री निवासस्थानी जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज भेट घेतली.  मातोश्रीवरील चर्चेत युतीबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्वव ठाकरेंना भेटायला मातोश्रीवर गेले होते. काही करून सेना भाजप युतीचा मार्ग मोकळा करा, अमित शाहांकडून महाराष्ट्र भाजपला अल्टीमेटम दिला गेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री स्वतः उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेले.
काय झालं आजच्या बैठकीत ? 
सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेना लोकसभेसह विधानसभा निवडणुकीसाठी 50:50  जागांच्या मागणीवर ठाम आहे. या दोन्ही मागण्या विशेषतः लोकसभेच्या अर्ध्या-अर्ध्या जागावाटपाची सेनेची मागणी भाजपला मान्य होण्याची शक्यता कमी आहे. तसंच युती फक्त भजपशी होणार असून मित्रपक्षांशी नाही असे सेनेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. महत्वाचे म्हणजे मित्रपक्षांना भाजपने सोडलेल्या मतदारसंघातूनही सेनेचा उमेदवार लढणार असल्याची शक्यता आहे. समान जागावाटप, राज्यात मुख्यमंत्री आणि घटक पक्षांची जबाबदारी घेणार नाही या अटीशर्तींमुळे भाजपच्या समोरचा पेच वाढताना दिसतोय. मात्र सेना आपल्या बार्गेनिंग पॉवरचा जास्तीत जास्त फायदा उचलण्याच्या तयारीत आहे.
हल्ल्यानंतरही युतीचं गुराळ सुरू ठेवल्याने दोन्ही पक्षांवर टीकेची झोड
भाजपाने मातोश्रीवर जात चर्चा करत एक पाऊल पुढे टाकलं आहे. शिवसेनेलाही युती करण्यासाठी सोयीस्कर कारण द्यावं लागणार आहे. मात्र आज पुलवामात झालेल्या भ्याड हल्ल्यानंतरही युतीचं गुराळ सुरू ठेवल्याने दोन्ही पक्षांवर सर्व स्तरातून टीकेची झोड उठली आणि पुन्हा एकदा युतीच्या घोषणेचा मुहूर्त हुकला. आता मुख्यमंत्री अमित शहा यांच्याकडे सेनेच्या मागण्यांचा प्रस्ताव ठेवतील आणि शेतकरी, हिंदुत्व किंवा सन्मानजनक तोडगा अशा गोंडस नावाखाली युतीच्या पॅच अपची घोषणा करतील.
शिवसेना-भाजपमध्ये युती होणार की नाही, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. युतीसाठी भाजप नेते सातत्याने प्रयत्न करत आहेत. परंतु शिवसेना भाजपला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. युतीबाबत निर्णय घेण्यासाठी खासदार संजय राऊत यांनी भाजपला 48 तासांचा अल्टिमेटम दिला होता. युतीसाठी अल्टीमेटम देताना संजय राऊत म्हणाले की, "महाराष्ट्रात शिवसेना भाजपचा मोठा भाऊ असून आगामी निवडणुकीनंतर मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल," असे म्हणत राऊतांनी भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, शिवसेनेकडून 1995 च्या फॉर्म्यूलावर जोर दिला जात आहे. विधानसभेच्या 150 जागा आणि मुख्यमंत्रीपदाची मागणी शिवसेनेने केली आहे. लोकसभेसाठी शिवसेनेकडून पालघर, भिवंडी, दिंडोरी, जळगावपैकी काही मतदारसंघांची मागणी केली आहे. तसेच लोकसभेसाठी 23/25 जागांबाबत चर्चा सुरु आहे. परंतु राज्यसभेची एक जागा द्यावी अशी मागणीदेखील शिवसेनेने केली आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 पैकी 25 जागा शिवसेनेला सोडण्यात याव्यात. विधानसभेला 150 जागा शिवसेनेच्या वाट्याला यायला हव्या. केंद्रात एनडीएचं सरकार आल्यास पंतप्रधान भाजपचा असेल मात्र राज्यात युतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, असे वक्तव्य शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी केले होते.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Accident: पहाटे 5 ची वेळ, बीएमडब्ल्यूचा ताशी 100+ स्पीड अन् 3 बळी! मुंबई कोस्टल रोडवरील भीषण अपघातामागचं 'सायन्स' काय?
पहाटे 5 ची वेळ, बीएमडब्ल्यूचा ताशी 100+ स्पीड अन् 3 बळी! मुंबई कोस्टल रोडवरील भीषण अपघातामागचं 'सायन्स' काय?
Disha Salian and Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंना नोटीस द्यायला दिशा सालियनच्या वडिलांनी मातोश्रीवर जाणे योग्य होते का? असीम सरोदेंची प्रतिक्रिया, म्हणाले....
आदित्य ठाकरेंना नोटीस द्यायला दिशा सालियनच्या वडिलांनी मातोश्रीवर जाणे योग्य होते का? असीम सरोदेंची प्रतिक्रिया, म्हणाले....
Mumbai Accident CCTV Footage: कोस्टल रोडच्या पुलावरुन बीएमडब्ल्यू खाली पडतानाचं CCTV दृश्यं, कार 50 फुटावरुन खाली आपटली, गाडीचा चेंदामेंदा
कोस्टल रोडच्या पुलावरुन बीएमडब्ल्यू खाली पडतानाचं CCTV दृश्यं, कार 50 फुटावरुन खाली आपटली, गाडीचा चेंदामेंदा
Mumbai News: कृत्रिम तलावात उतरला विद्युत प्रवाह! कृत्रिम तलावात गौरी-गणपती विसर्जनावेळी शॉक लागून मृत्यू, बायकोनंतर मुलगाही गमावला; वृद्ध वडिलांचा आक्रोश, नागरिकांचा संताप
कृत्रिम तलावात उतरला विद्युत प्रवाह! कृत्रिम तलावात गौरी-गणपती विसर्जनावेळी शॉक लागून मृत्यू, बायकोनंतर मुलगाही गमावला; वृद्ध वडिलांचा आक्रोश, नागरिकांचा संताप

व्हिडीओ

Sangli krishna river : दूषित पाणी थेट नदीत, कृष्णेचा रंग बदलला Special Report
Mumbai IIT Students Protest : विद्यार्थ्याचा मृत्यू, कॅम्पस हादरला; IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन
Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
किम जोंग उनच्या उत्तर कोरियाने काही तासांच्या अंतराने दोन बॅलिस्टिक मिसाईल डागल्या; जपानी पीएमकडून तातडीने मोठ्या हालचाली, दक्षिण कोरियातही खळबळ
किम जोंग उनच्या उत्तर कोरियाने काही तासांच्या अंतराने दोन बॅलिस्टिक मिसाईल डागल्या; जपानी पीएमकडून तातडीने मोठ्या हालचाली, दक्षिण कोरियातही खळबळ
पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणुकीत विरोधी उमेदवारांच्या अटकेची मालिका सुरूच! आता पाच वर्षांपूर्वीची जुनी केस काढून आणखी एका उमेदवाराला उचललं
पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणुकीत विरोधी उमेदवारांच्या अटकेची मालिका सुरूच! आता पाच वर्षांपूर्वीची जुनी केस काढून आणखी एका उमेदवाराला उचललं
Disha Salian and Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंना नोटीस द्यायला दिशा सालियनच्या वडिलांनी मातोश्रीवर जाणे योग्य होते का? असीम सरोदेंची प्रतिक्रिया, म्हणाले....
आदित्य ठाकरेंना नोटीस द्यायला दिशा सालियनच्या वडिलांनी मातोश्रीवर जाणे योग्य होते का? असीम सरोदेंची प्रतिक्रिया, म्हणाले....
काल राहुल गांधींसमोर PM  मोदींची मिमिक्री केली अन् आज कॉमेडियनचा शो रद्द; म्हणाला, ''अब अंडरग्राऊंड होने का समय आ गया है'
काल राहुल गांधींसमोर PM  मोदींची मिमिक्री केली अन् आज कॉमेडियनचा शो रद्द; म्हणाला, ''अब अंडरग्राऊंड होने का समय आ गया है'
Solapur News : दुष्काळाची दाहकता! हिरव्या चाऱ्याचे भाव भिडले गगनाला; सोलापूर जिल्ह्यात बळीराज्यावर पशुधन विकण्याची वेळ
दुष्काळाची दाहकता! हिरव्या चाऱ्याचे भाव भिडले गगनाला; सोलापूर जिल्ह्यात बळीराज्यावर पशुधन विकण्याची वेळ
Asian Games 2026 : आधी शेफालीचं वादळी शतक, मग गोलंदाजांचा तांडव; बांगलादेशला लोळवत भारत अंतिम फेरीत, पाकिस्तानचा गेम ओव्हर
आधी शेफालीचं वादळी शतक, मग गोलंदाजांचा तांडव; बांगलादेशला लोळवत भारत अंतिम फेरीत, पाकिस्तानचा गेम ओव्हर
Smriti Mandhana News : स्मृती मानधनाने इतिहास रचला, आणखी एक विक्रम रचला, टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये थक्क करणारी कामगिरी
स्मृती मानधनाने इतिहास रचला, आणखी एक विक्रम रचला, टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये थक्क करणारी कामगिरी
Radhakrishna Vikhe Patil on Nila Vikhe Patil: महाराष्ट्र सोडा विखे-पाटलांच्या घराण्याचा स्वीडनच्या संसदेत डंका, पुतणी खासदार होताच राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, ‘तिच्याकडून मला...’
महाराष्ट्र सोडा विखे-पाटलांच्या घराण्याचा स्वीडनच्या संसदेत डंका, पुतणी खासदार होताच राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, ‘तिच्याकडून मला...’
Embed widget