एक्स्प्लोर

Tiger Shroff: 'हत्या नाही, पण त्याला घाबरवायचं होतं'; टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात 2 आरोपींनी पोलिसांसमोर तोंड उघडलं, काय काय सांगितलं?

Tiger Shroff Attack Shooters: टायगर श्रॉफची हत्या करायची नव्हती, केवळ घाबरवायचे होते, शूटर फूल सिंह आणि रेहान यांचा चौकशीदरम्यान मोठा दावा

Tiger Shroff Attack Case: 18 ऑक्टोबर रोजी झालेल्या बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) हल्ला प्रकरणात पोलिसांना अनेक धागेदोरे सापडत आहेत. या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी 11 आरोपींच्या (Tiger Shroff Attack) मुसक्या आवळ्या आहेत. सुरुवातीला 3 आरोपींना कोटा पोलिसांनी ताब्यात घेतलं.  यानंतर पोलिसांना या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यात यश आलं. दरम्यान,  या प्रकरणी आता दोन आरोपींची कथित (Shooters) कबुली समोर आली आहे. अभिनेत्याला केवळ घाबरवायचे होते, अशी माहिती आरोपींच्या चौकशीतून समोर आली आहे.  आरोपी नेमकं काय काय  म्हणाले, पाहूयात.

दोन आरोपींच्या चौकशीतून टायगर श्रॉफ प्रकरणात कोणती माहिती उघड? (Tiger Shroff Attack Case Two Shooters Claims Investigation)

मिळालेल्या माहितीनुसार, टायगर श्रॉफ प्रकरणात दोन आरोपींनी चौकशीदरम्यान, मोठा दावा केला आहे.  शूटर (Tiger Shroff Shooters) फूल सिंह आणि रेहान यांची पोलिसांनी कसून चौकशी केली. यावेळी  दोघांनीही अभिनेता टायगर श्रॉफची हत्या करायची नव्हती, तर त्याला केवळ घाबरवायचे होते, असा मोठा दावा आरोपींनी चौकशीदरम्यान केला आहे.  बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी, हा गोळीबाराचा प्रकार  घडवून आणला असल्याची कबुली  आरोपींनी दिली. 

आरोपींनी चौकशीदरम्यान, पोलिसांना सांगितले की, टायगर श्रॉफ फुटबॉल सामना खेळत असताना तो शूटरच्या अगदी जवळ उभा होता.  त्यावेळी आरोपींना टायगर श्रॉफ अगदी स्पष्टपणे दिसत होता.  त्याच्या आसपास सुरक्षा रक्षही नव्हते, अशी माहिती आरोपींकडून प्राप्त झाली आहे.   दरम्यान, हत्या करण्याचा हेतू असता, तर फुटबॉल सामना सुरू असतानाच हल्ला केला असता, असं आरोपींनी चौकशीदरम्यान म्हटलं आहे, अशी माहिती समोर आली आहे.

टायगर श्रॉफला केवळ घाबरवण्याच्या उद्देशाने गोळीबार करण्यास सांगितले असल्याचं शूटरचे म्हणणे आहे.  फूल सिंह आणि रेहान यांनी केलेल्या दाव्यांची क्राइम ब्रँचकडून पडताळणी सुरू आहे. दरम्यान, टायगर श्रॉफवर हल्ला घडवून आणण्यामागचा हेतू काय होता? हा कट रचण्यामागे नेमका कुणाचा हात होता? याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणात आरोपींकडून कोण कोणती आणखी माहिती मिळतेय? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Tiger Shroff Juhu Attack: 'हल्ल्यापूर्वी धमकी मिळाली होती का?'; टायगर श्रॉफने जबाबात काय काय सांगितलं? A to Z माहिती

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today : आज नोव्हेंबरचा पहिला दिवस 5 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने नशीब सोन्याहून पिवळं होणार, वाचा आजचे राशीभविष्य
आज नोव्हेंबरचा पहिला दिवस 5 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने नशीब सोन्याहून पिवळं होणार, वाचा आजचे राशीभविष्य
भाजपकडून अफवा पसरवण्याचं काम सुरु, रॅलीमुळं व्यापाऱ्यांचे नुकसान होणार नाही, नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?  
भाजपकडून अफवा पसरवण्याचं काम सुरु, रॅलीमुळं व्यापाऱ्यांचे नुकसान होणार नाही, नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?  
शिक्षण फक्त 10 वी पास, पगार मिळणार 63 हजार, तरुणांना सरकारी नोकरीची मोठी संधी, अर्ज भरण्याची मुदत किती दिवस? 
शिक्षण फक्त 10 वी पास, पगार मिळणार 63 हजार, तरुणांना सरकारी नोकरीची मोठी संधी, अर्ज भरण्याची मुदत किती दिवस? 
10 वी पास महिलांसाठी LIC ची जबरदस्त योजना, दरमहा 7000 रुपये मिळवण्याची संधी, जाणून घ्या सविस्तर माहिती 
10 वी पास महिलांसाठी LIC ची जबरदस्त योजना, दरमहा 7000 रुपये मिळवण्याची संधी, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Advertisement

व्हिडीओ

Thane Metro First Look : ठाणे मेट्रोचा फर्स्ट लूक 'माझा’वर Special Report
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
खबऱ्याची माहिती, प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्यावर पोलिसांचा छापा; 58 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक
खबऱ्याची माहिती, प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्यावर पोलिसांचा छापा; 58 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक
दुष्काळी परिस्थितीत शरद पवार मैदानात, विकायला गाव काढलेल्या तुळशीत दुष्काळाची पाहणी करणार, थेट ग्रामस्थांशी साधणार संवाद 
दुष्काळी परिस्थितीत शरद पवार मैदानात, विकायला गाव काढलेल्या तुळशीत दुष्काळाची पाहणी करणार, थेट ग्रामस्थांशी साधणार संवाद 
Gokul Election: सुट्टीदिवशीच गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदलीने चर्चा रंगली! थेट मराठवाड्यात पाठवलं
सुट्टीदिवशीच गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदलीने चर्चा रंगली! थेट मराठवाड्यात पाठवलं
दुष्काळाच्या भीषण संकटात कृत्रिम पावसाची आशा; ड्रोनद्वारे पाऊस पाडण्याचा प्रयोग, 400 मीटर उंचीवरुन क्लाउड सीडिंगची चाचणी
दुष्काळाच्या भीषण संकटात कृत्रिम पावसाची आशा; ड्रोनद्वारे पाऊस पाडण्याचा प्रयोग, 400 मीटर उंचीवरुन क्लाउड सीडिंगची चाचणी
ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीचा महाभियोग प्रस्ताव मंजूर; मॉक संसद अधिवेशनाला 19 विरोधी पक्षातील 215 खासदारांची खासदारांची हजेरी
ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीचा महाभियोग प्रस्ताव मंजूर; मॉक संसद अधिवेशनाला 19 विरोधी पक्षातील 215 खासदारांची खासदारांची हजेरी
Azam Khan: आजम खान जेलमधून बाहेर येताच EDकडून अटक; जेलच्या दारात अटकेसाठी ED पॅरामिलिटरी फौजा घेऊन पोहोचली
आजम खान जेलमधून बाहेर येताच EDकडून अटक; जेलच्या दारात अटकेसाठी ED पॅरामिलिटरी फौजा घेऊन पोहोचली
Raj Thackeray: पहिली भेट, गँगवार ते शिव्यांची मुलाखत, बाळासाहेबांची आठवण; राज ठाकरेंचं भाषण, संजय राऊत गहिवरले, Video
Video: पहिली भेट, गँगवार ते शिव्यांची मुलाखत, बाळासाहेबांची आठवण; राज ठाकरेंचं भाषण, संजय राऊत गहिवरले
Embed widget