एक्स्प्लोर
आरजे मलिष्काच्या घरी डेंग्यूच्या अळ्या, बीएमसीकडून नोटीस
मलिष्काच्या घरी केलेल्या तपासणीत मुंबई महापालिकेने कर्मचाऱ्यांना डेंग्यूच्या अळ्या सापडल्या आहे.
![आरजे मलिष्काच्या घरी डेंग्यूच्या अळ्या, बीएमसीकडून नोटीस Dengue Mosquitoes Breeding Found At Rj Malishkas House Bmc Issues Notice आरजे मलिष्काच्या घरी डेंग्यूच्या अळ्या, बीएमसीकडून नोटीस](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/19090049/RJ_Malishka.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मुंबई महापालिकेच्या कारभारावर "मुंबई, तुझा बीएमसीवर भरोसा नाय काय," असं म्हणत ताशेरे ओढणाऱ्या आरजे मलिष्काविरुद्ध शिवसेनेने मोहीमच उघडली आहे. मलिष्काच्या घरी केलेल्या तपासणीत मुंबई महापालिकेने कर्मचाऱ्यांना डेंग्यूच्या अळ्या सापडल्या आहे.
मुंबई मनपाने मंगळवारी मलिष्काच्या वांद्र्यातील पाली नाका इथल्या सनराईज इमारतीमधील घरात तपासणी केली. यावेळी घरातील शोभेच्या कुंडीखालील डिशमध्ये साठलेल्या पाण्यात डेंग्यूच्या अळ्या आढळल्या. यानंतर महापालिकेने मलिष्काला नोटीस बजावली आहे.
याप्रकरणी मलिष्कावर नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी सभागृह नेते यशवंत जाधव यांनी केली आहे.
डेंग्यूच्या अळ्यांची पैदास होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी यासाठी महापालिका मोठ्या प्रमाणावर जनजागृती करते. मात्र तरीही मलिष्काच्या घरी अळ्या आढळल्याने एच वॉर्ड कार्यालयाने नियमानुसार नोटीस बजावली आहे, असं बीएमसीतर्फे सांगण्यात आलं आहे.
मुंबई महापालिकेने बजावलेली पहिली नोटीस आहे. डेंग्यूच्या अळ्या साफ करा, अशा सूचना या नोटीसमध्ये करण्यात आली आहे. या नोटीसनंतरही जर डेंग्यूच्या अळ्या साफ झाल्या नाही तर दुसऱ्यांंदा नोटीस बजावण्यात येते. तरीही कोणतीही कारवाई न झाल्यास महापालिकेकडून मलिष्काला दंड ठोठावण्यात येईल.
संबंधित बातम्या
रेड एफएमवर 500 कोटींचा दावा ठोकण्याची शिवसेनेची मागणी
मुंबईत पाऊसच जोरदार पडतो, पालिका काय करणार : उद्धव ठाकरे
शिवसेनेकडून आरजे मलिश्कावर टीका करणारं गाणं
मुंबई, तुला बीएमसीवर भरवसा नाय काय?, आर.जे. मलिश्काचं गाणं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
व्यापार-उद्योग
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)