एपीएमसी मार्केट मधील माथाडी कामगारांना विमा सुरक्षा कवच लागू करण्याची मागणी
कोरोना काळात एपीएमसी सुरू ठेवून शहरवाशीयांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या माथाडी कामगारांना विमा सुरक्षा कवच लागू करण्याची मागणी माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी केली आहे.
नवी मुंबई : कोरोना काळात मार्चपासून आजपर्यंत सुट्टी न घेता मुंबई आणि उपनगराला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचे महत्वाचे काम वाशीतील एपीएमसी मार्केट मधील माथाडी कामगारांनी केले आहे. हे करीत असताना अनेक कामगार कोरोना पॉझिटीव्ह झाले. पाच जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या या माथाडी कामगारांना राज्य आणि केंद्र सरकारने विमा कवच द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंञी अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांची भेट घेत निवेदनाव्दारे माथाडी कामगारांचा विमा कवचमध्ये समावेश करण्याची मागणी केली आहे.
कोरोना काळात संपुर्ण जनता घरी बसली असताना माथाडी कामगार मात्र आपला जीव मुठीत धरुन कामावर हजर होता. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली या शहरी भागातील जनतेला जीवनाश्यक वस्तूंचा कोणताच तुटवडा पडू नये यासाठी कष्ट करीत होता. दुसरीकडे गावाकडे शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला, फळे, कांदाबटाटा या नाशवंत मालाची नासधुस होवू नये. यासाठी काळजी घेत कोरोना काळात एपीएमसी मार्केट सुरू ठेवले. हे करीत असताना माथाडी कामगारांचे कोरोनामुळे जीवही गेले आहेत. त्यामुळे या कष्टकरी कामगारांना विमा कवच देवून न्याय द्यावा, अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. माथाडी कामगारांबरोबर बोर्डाचे सुरक्षा रक्षकही अहोरात्र काम करीत असल्याने 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्यांचाही समावेश विमाकवचमध्ये करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
मुंबईत केवळ 15 दिवसांत 300 'ऑक्सीजन बेड'सह 1 हजार खाटांच्या उपचार केंद्राची निर्मिती
रेल्वे प्रवास करण्यास परवानगी मिळावी जीवनाश्यक वस्तूंच्या मालाची लोडींग, अनलोडींग, थापी, वाराई व त्यानुषंगीक कामे करणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या माथाडी मंडळात नोंदीत असलेल्या माथाडी, वारणार, मापाडी व पालावाला महिला कामगार या घटकांचा अत्यावश्यक घटक म्हणून समावेश केला जावा व त्याला विमा कवच/सानुग्रह सहाय्य लागू करण्यात यावे, या घटकांना रेल्वे प्रवास करण्यास परवानगी मिळावी. माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नासंदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान झालेल्या संयुक्त बैठकितील निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित विभागाला व्हाव्या, अशी मागणी महाराष्ट्र राज्य माथाडी,ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने केली आहे.
KEM रुग्णालयात ऑक्सिजन न मिळाल्याने तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप