एक्स्प्लोर
इक्बालने दाऊदचे पाकिस्तानातील तीन पत्ते पोलिसांना दिले!
पाकिस्तानमधील कराचीतल्या क्लिफ्टनमध्ये असलेल्या दाऊदच्या तीन बंगल्यांचे पत्ते इक्बाल कासकरनं ठाणे पोलिसांना दिले आहेत.
ठाणे : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सख्खा भाऊ इक्बाल कासरकरने मोठी माहिती पोलिसांना दिली आहे. दाऊद इब्राहिम, त्याचा भाऊ अनिस इब्राहिम आणि छोटा शकील हे तिघेही पाकिस्तानातच असल्याचं इक्बाल कासरकरनं कबुली जबाबादरम्यान पोलिसांना सांगितलं.
पाकिस्तानमधील कराचीतल्या क्लिफ्टनमध्ये असलेल्या दाऊदच्या तीन बंगल्यांचे पत्ते इक्बाल कासकरनं ठाणे पोलिसांना दिले आहेत.
त्याचबरोबर, दाऊदच्या केसालाही धक्का लागू नये यासाठी त्यानं कशा प्रकराचं सुरक्षा कवच स्वतःच्या घराभोवती विणलंय याची देखील माहिती इक्बाल कासरकरनं पोलिसांना दिली. सुरक्षेसाठी दाऊदने आजूबाजूच्या प्रॉपर्टीचीही खरेदीकेली असल्याची माहिती इक्बालने दिली.
बिल्डरकडे खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली ठाणे पोलिसांनी इक्बाल कासरकरला अटक केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement