(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Water Supply : मुंबईकरांनो पाण्याची चिंता मिटली! पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणीसाठ्यात वाढ
Mumbai Water Supply : मुंबईकरांना सहा महिने पुरेल इतका पाणीसाठा सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये झाला आहे.
Mumbai Water Supply : मुंबईत (Mumbai) जुलै महिन्यांत मुसळधार पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये (Dam) मुबलक पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांना पुढील सहा महिने पाण्याची चिंता मिटली असल्याचं सांगण्यात येत आहे. जर पावसाने मुंबईत पावसाने अशीच मुसळधार हजेरी लावली तर मुंबईकरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटू शकतो.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या 48 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यापर्यंत मुंबईला हे पाणी पुरेल असं सांगण्यात येत आहे. तसेच जर मुंबईत पावसाचा जोर असाच कायम राहिला तर महापालिकेकडून करण्यात आलेली पाणी कपात ही रद्द करण्यात येऊ शकते.
मुंबईतील धरणांची सद्य स्थिती
मुंबईला एकूण सात धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. त्यामध्ये अप्पर वैतरणा धरण, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या धरणांचा समावेश आहे. यामधील तुळशी हे धरण 100 टक्के भरले आहे. तर तानसा धरणामध्ये 86.66 टक्के पाणीसाठा झाला आहे. अप्पर वैतरणा धरणामध्ये 19.20 टक्के, मोडक सागर धरणामध्ये 75.17 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. मध्य वैतरणा धरणामध्ये 56.23 टक्के, भातसा धरणातही 56.23 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. विहार धरणामध्ये 75.82 टक्के पाणीसाठा झाला आहे.
मुंबईत पडणाऱ्या पावसामुळे मुंबईतील ही सातही धरणे ऑगस्टपर्यंत 100 टक्के भरतात. पण सध्या मान्सून बराच लांबणीवर पडतो. त्यामुळे मे अखेर ते जूनपर्यंत या धरणांमधील पाणीसाठा अक्षरश: तळाला जातात. यावर्षी देखील हा पाणीसाठा सात टक्क्यांवर गेला होता. त्यामुळे मुंबई महापालिकेकडून 1 जुलैपासून पाणीकपात करण्यात आली होती. या सातही धरणांमधून मुंबईला दररोज जवळपास 3850 लिटर पाणीपुरवठा केला जातो.
मागील वर्षातील स्थिती
मागील वर्षी 22 जलैपर्यंत या सातही धरणांमध्ये 53.86 टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध झाला होता. त्यामुळे पाणीसाठा हा 11 टक्क्यांपर्यंत खाली गेला होता. तेव्हा मुंबई महापालिकेने 27 जूनपासून पाणीकपात केली होती. पण त्यानंतर जुलैच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये मुंबई महापालिकेकडून ही पाणीकपात मागे घेण्यात आली होती. यावर्षी देखील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत लक्षवेधी वाढ होताना दिसत आहे.
मुंबईत जर असाच पाऊस बरसत राहिला तर मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटू शकते. सध्या या सातही धरणांमध्ये एकूण 47.54 टक्के इतका पाणीसाठा आहे. तसेच जर तलावांमध्ये 70 टक्के पाणीसाठा झाला की 10 टक्के पाणीकपात करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
हे ही वाचा :
Mumbai Rains : मुंबईसह उपनगरात विक्रमी पाऊस, 24 तासांमध्ये 204 मिमी पावसाची नोंद