मुंबईसह महाराष्ट्रात दहीहंडीचा थरार, ठाण्यात प्रो दहीहंडीचा उत्साह
मध्यरात्री मोठ्या उत्साहात कृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

ठाणे - सालाबादप्रमाणे ठाण्यातही दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. नौपाड्यात अनेक पथकांनी ढोलताशाची प्रात्यक्षिकं केली. कृष्ण जन्माष्टमीनिमित्त पंढरपुरातही विठुरायच्या डोक्यावर मुंडासे आणि हातात चांदीची काठी देण्यात आली. देवाच्या मस्तकी 110 हात लांबीचे वैशिष्ठ्यपूर्ण पागोटे बांधण्यात आले. विठ्ठल हे कृष्णाचंच रुप असल्याची श्रद्धा असल्यानं शेकडो वर्षांपासून विठ्ठल मंदिरात कृष्ण जन्मोत्सव साजरा होतो. रात्री 12 वाजता जन्मसोहळ्यावेळी सभामंडपात बांधलेल्या पाळण्यात बाळकृष्णाच्या मूर्तीवर फुले उधळण्यात आली. हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक विठ्ठल मंदिरात उपस्थित होते. LIVE UPDATE
- ठाणे - जय जवान पथकाची मुख्यमंत्र्यांना 9 थरांची सलामी
- आतापर्यंत मुंबईत विविध ठिकाणी 6 गोविंदा जखमी
- जोगेशवरीच्या युवा जिद्दी मराठा या गोविंद पथकाने चित्ररथ तयार करून महाराष्ट्र पोलिसांना मानवंदना दिली आहे. गेल्या दहा वर्षापासून हे पथक वेगवेगळ्या विषयावर चित्ररथ तयार करत आहे. यंदा हा चित्ररथ दहीहंडी उत्सवामध्ये अनेकांचं लक्ष वेधून घेतोय
- ठाणे - स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडीत आई चिखलादेवी गोविंदा मंडळाने क्लस्टरला विरोध करणारे फलक दाखवले...
- शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी वरळीतील जांबोरी मैदानात आगळी वेगळी दहीहंडी उभारली आहे. दहीहंडी पारंपरिक पद्धतीनं साजरी करत कोणताही गाजावाजा न करत साध्या पद्धतीनं साजरी करत आहे. दुसरीकडे याच दहीहंडीच्या माध्यमातून केरळच्या पूरसग्रस्तांना मदत करणार आहेत
- मुंबई : दहीहंडीचा सराव करताना जखमी झालेल्या 14 वर्षीय चिराग पटेकर या गोविंदाला मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्याकडून एक लाख रुपयांची मदत, चिराग पटेकरवर खार इथल्या होली फॅमिली हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरु
मुंबई उपनगरात देखील दहीहंडी उत्सवाला जल्लोषात सुरुवात झाली आहे. घाटकोपर येथील भटवडी विभागात लोकसेवा चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आयोजित दहीहंडी उत्सवाला विधीवत पूजन करून सुरुवात झाली. या ठिकाणी महिला आणि पुरुष गोविंदा पथकांनी थर लावून सलामी देण्यास सुरुवात केली आहे.
कोकण नगर गोविंदा पथकाने 6 थर लावून दादरची दहीहंडी फोडली
दादरमध्ये थर लावायला सुरुवात, जोगेश्वरीच्या साईराम गोविंदा पथकाची 8 थरांची सलामी
1) साईराम गोविंदा पथक जोगेश्वरी 8 थराची सलामी दिली
2) युवा जिद्दी मराठा गोविंदा पथकाने चित्ररथद्वारे महाराष्ट्र पोलिसांना मानवंदना दिली
3) हिंदू एकता गोविंदा पथक 8 थर सलामी
येवला -
गोकुळाष्टमीनिमित्त येवल्यामध्ये बाळगोपाळांची अनोखी वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांच्या धडपड मंचतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेत 130 बाळगोपाळांनी भाग घेतला. नटखट, गंभीर, खेळकर, बासरीवाला, दहिहंडीतील लोणी खाणाऱा माखणचोर अशी श्रीकृष्णाची अनेक रुपं बाळगोपाळांनी वेशभूषेच्या माध्यमातून साकारली . विशेष म्हणजे २ महिन्याच्या बालकापासून ३ वर्षांच्या मुलांनी यात सहभाग घेतला. शेवटी या बाळगोपाळांना बक्षीसांचं वितरणही करण्यात आलं.























