अरे काय तर काय विचारताय, दादा भुसे-थोरवेंच्या राड्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देणं टाळलं, चिडून निघून गेले
Eknath Shinde MLA Fight : ऐन निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेमधील मंत्री दादा भुसे (dada bhuse) आणि आमदार महेंद्र थोरवे (mahendra thorve) यांच्यामध्ये धक्काबुक्की झाल्याचं समोर आले.
![अरे काय तर काय विचारताय, दादा भुसे-थोरवेंच्या राड्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देणं टाळलं, चिडून निघून गेले Dada Bhuse Mahendra Thorve fight CM Eknath Shinde reaction on Shiv Sena MLA fight at Vidhan Bhavan Maharashtra अरे काय तर काय विचारताय, दादा भुसे-थोरवेंच्या राड्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देणं टाळलं, चिडून निघून गेले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/29/da25a827f03d943ecb1e52c2a9a565701709184028552359_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Eknath Shinde MLA Fight : ऐन निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेमधील मंत्री दादा भुसे (dada bhuse) आणि आमदार महेंद्र थोरवे (mahendra thorve) यांच्यामध्ये धक्काबुक्की झाल्याचं समोर आले. महेंद्र थोरवे मतदारासंघातील कामासाठी दादाभुसे यांच्याकडे गेले होते. त्यावेळी दोघांमध्ये वाद, धक्काबुक्की झाली. शिवसेना प्रवक्ते भरत गोगावले आणि शंभूराज देसाई यांनी मध्यस्थी करत वाद सोडवला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सर्व प्रकरण समजून घेत दोघांची समजूत काढल्याचं समोर आलेय. पण या धक्काबुक्कीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं.
दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांच्यातील धक्काबुक्कीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर देणं टाळलं. त्यानंतर ते मीडियासमोरुन रागारागातून निघून गेले. पत्रकारांनी या वादावर प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, काहीतरी काय विचारता. अधिवेशनाचा विषय आहे, त्यावर विचारा. दरम्यान, शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी असा वाद झालाच नाही, अशी प्रतिक्रिया दिली. दरम्यान, सभागृहातून बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दादा भुसे आणि महेंद्र थोरात यांच्यासोबत चर्चा केली. त्यांच्याकडील कागदपत्रे पाहिली. दोघांची समजूत घातल्याचं व्हिडीओ फुटेजमध्ये दिसत आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकणावर प्रतिक्रिया देणं टाळलं.
दादा भुसे काय म्हणाले ?
शंभूराज देसाई म्हणाले की, "बोलताना कोणाचा आवाज मोठा वाटला, म्हणजे वाद झाला, असं नाही योगायोगानं मी तिथे होतो. मला हे सर्व प्रकरण जेव्हा समजलं की, एकमेकांमधील वाद थोड्याशा उंच आवाजामध्ये सुरू आहे, म्हणून दोघांनाही आतमध्ये घेऊन गेलो, आत लॉबीमध्ये गेल्यानंतर आमदारांनी त्यांचा विषय मला सांगितला आणि आमदारांचं काम कसं मार्गी लावता येईल? हे पाहिलं. सर्वांचे मतदारसंघातील प्रश्न असतात. मी त्यांच्यासोबत तिथे होतो. दोघांमध्ये चिडाचिडी झालेली नाही, कोणी कोणाच्याच अंगावर धावून गेलेलं नाही. आमदारांची जी कामं आहेत, त्यासाठी आम्ही उद्याच चर्चा करुन तोडगा काढू आणि त्यांचं जे काम आहे, ते लवकरात लवकर मार्गी लावलं जाईल आणि मंत्र्यांचा योग्य समन्वय निश्चितपणे आम्ही ठेवलेला आहे."
"माध्यमांना सुद्धा माझी हात जोडून विनंती आहे, माध्यमांचे प्रतिनिधी आता काही आतमध्ये येतात, त्यांनीसुद्धा खात्री केल्याशिवाय अशी कोणतीही बातमी चालवणं योग्य नाही, त्यांनी जर आमदारांना विचारलं असतं तर ते मी सांगितलं असतं. मी सभागृहामध्ये होतो, माझं सभागृहामध्ये काम होतं, पण जेव्हा मला हे समजलं की, बाहेर माध्यमांमध्ये दोन आमदार एकमेकांना भिडल्याचं दाखवलं जात आहे म्हणून मी सभागृहातल्या कामकाजातून बाहेर येऊन आपल्या समोर ही वस्तुस्थिती सांगतोय. तुम्ही जे सांगताय असं बिलकुल काहीही घडलेलं नाही.", असं शंभूराज देसाई म्हणाले.
आणखी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)