एक्स्प्लोर
ओखी चक्रीवादळ मुंबईपासून एक हजार किमीवर
मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

मुंबई : मुंबईलगतच्या अरबी समुद्राला 4 आणि 5 डिसेंबरला ओखी वादळाच्या धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
अरबी समुद्रात ओखी नावाचं चक्रीवादळ तयार झालंय. हे वादळ मुंबईच्या समुद्रापासून 1000 किमीवर असल्याची माहिती राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलीय. 6 डिसेंबरपर्यंत या वादळाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे.
ओखी वादळाचा तडाखा बसलेल्या, केरळ आणि तमिळनाडूतील सुमारे एक हजार मच्छिमारांनी सिंधुदुर्गच्या देवगडमध्ये आश्रय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत सर्व मच्छिमार सुखरुप असल्याचं सांगितलं.
जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासनाला या सर्व मच्छिमारांची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
क्रिकेट
Advertisement
Advertisement

















