एक्स्प्लोर
मुंबई विमानतळावर 2 किलो 249 ग्रॅम सोनं जप्त

मुंबई : मुंबई विमानतळावर 2 कोली 249 ग्रॅम सोनं जप्त करण्यात आले आहे. कस्टम विभागाने कारवाई केली असून, अहमद थमीज एमिरेट्स-EK506 विमानाने दुबईहून मुंबईत आला होता. त्यावेळी तपासादरम्यान कस्टम विभागाने जप्तीची कारवाई केली. 2 किलो 249 ग्रॅम सोन्याला सिलेंडरचं शेप देण्यात आले होते. या सोन्याची किंमत 60 लाख 91 हजार 912 रुपये एवढी आहे.
अत्यंत लहान अशा सिलेंडर शेपमध्ये सोनं लपवण्यात आले होते. पोर्टेबल कार वॉशिंग मशिनमध्ये छोटंसं सिलेंडर शेपमधील सोनं लपवण्यात आले होते. सोन्यासोबतच 1 लाख 20 हजार रुपयांचे दोन आयफोनही जप्त करण्यात आले आहेत. म्हणजेच एकूण 62 लाख 11 हजार 912 रुपयांचं सोनं आणि मोबाईल जप्त केले आहेत.
अरशद एमपी नामक व्यक्तीला सोनं द्यायचं होतं, असं अटक केलेल्या आरोपीचे म्हणणे आहे. अरशद एमपीलही विमानतळाबाहेर अटक करण्यात आले आहे. कस्टम विभागाकडून पुढील तपास सुरु आहे.
अत्यंत लहान अशा सिलेंडर शेपमध्ये सोनं लपवण्यात आले होते. पोर्टेबल कार वॉशिंग मशिनमध्ये छोटंसं सिलेंडर शेपमधील सोनं लपवण्यात आले होते. सोन्यासोबतच 1 लाख 20 हजार रुपयांचे दोन आयफोनही जप्त करण्यात आले आहेत. म्हणजेच एकूण 62 लाख 11 हजार 912 रुपयांचं सोनं आणि मोबाईल जप्त केले आहेत.
अरशद एमपी नामक व्यक्तीला सोनं द्यायचं होतं, असं अटक केलेल्या आरोपीचे म्हणणे आहे. अरशद एमपीलही विमानतळाबाहेर अटक करण्यात आले आहे. कस्टम विभागाकडून पुढील तपास सुरु आहे. Before You Go
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion