Mumbai Local Mega Block Updates: महामेगाब्लॉगचा दुसरा दिवस; आज मध्य रेल्वेवरील 534 फेऱ्या रद्द; महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा!
CSMT Thane Mumbai Local Mega Block Updates: लोकलच्या तब्बल 534 फेऱ्या रद्द होणार करण्यात आल्या आहेत.
CSMT Thane Mumbai Local Mega Block Updates: मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि ठाणे (Thane) येथील फलाटांच्या विस्तारीकरणासाठी गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या महामेगाब्लॉक (Mega Block) मध्य रेल्वेवरील (Central Railway) प्रवाशांचे हाल सुरू असतानाच आज, शनिवारी त्यात आणखी भर पडणार आहे. लोकलच्या तब्बल 534 फेऱ्या रद्द होणार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
आज सर्वाधिक लोकल रद्द आहेत, तर परेल आणि भायखळा पर्यंतच मध्य रेल्वे धावत आहे, त्यामुळे 20 ते 25 मिनिटांच्या फरकाने लोकल ठाणे स्थानकात येत आहेत, यामुळे प्रवाश्यांना त्रास होताना दिसत आहे, मध्य रेल्वेने सांगून ऑफिस सुट्टी देत नाही, त्यामुळे कामाला जावेच लागते, एक आठवडा आधी का नाही सांगितला हा ब्लॉक, अश्या प्रतिक्रिया प्रवासी व्यक्त करत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक 10 आणि11 च्या रुंदीकरणासह ठाणे येथील फलाटांच्या कामासाठी शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मध्य रेल्वेकडून (Central Railway) मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात आला आहे. या मेगाब्लॉक कालावधीमध्ये 930 लोकल फेऱ्यांसह 72 मेल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
पश्चिम रेल्वेवरील 2 जूनचा ब्लॉक रद्द-
मध्य रेल्वेने सीएसएमटी आणि ठाणे येथील फलाटांच्या विस्तारीकरणासाठी महामेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल होत असताना रविवारच्या ब्लॉकमुळे प्रवाशांचे अधिक हाल होऊ नये, यासाठी रेल्वेने उद्या 2 जून रोजी घेण्यात येणारा पश्चिम रेल्वेवरील ब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
मेगा ब्लॉकमुळे राज्य निवडणूक आयोग कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मुभा
मेगा ब्लॉकमुळे राज्य निवडणूक आयोग कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची गैरसोय होत असल्याचं पाहायला मिळत आहे. 63 तासांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे कर्मचाऱ्यांना कार्यालयात येणं कठीण होत आहे. त्यामुळे जे कर्मचारी गैरहजर राहतील, त्यांची रजा कापली जाणार नाही, असं निर्णय घेण्यात आला आहे.
जम्बो मेगाब्लॉक का?
सीएसएमटीच्या फलाटांच्या रूंदीकरणाचं काम पूर्ण झालं असून ही लाईन कार्यान्वित करण्यासाठी रेल्वे प्रशासनानं हा ब्लॉक घेतलाय. या रूंदिकरणामुळे आता इथं 16 ऐवजी 24 डब्यांच्या लांब पल्याच्या गाड्या थांबवता येतील. इंटरलॉकिंग, सिग्नल यंत्रणा, ओव्हरहेड वायर या गोष्टी सुरू करण्याकरता आज रात्रीपासून हा ब्लॉक सुरू होईल. त्याकरता शुक्रवारी मध्यरात्रीनंतर रविवार दुपारपर्यंत सीएसएमटीची मध्य रेल्वे ही भायखळा रेल्वे स्थानकापर्यंतच तर हार्बर मार्गिका ही वडाळ्यापर्यंतच अप आणि डाऊन सुरू राहिल.
सीएसएमटी ते भायखळा या मेल लाईनवर आणि हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते वडाळा रोड मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम, रद्द होणाऱ्या गाड्यांची यादी खालीलप्रमाणे
1 जून रोजी या गाड्या अप रद्द
1) 11010 : पुणे-सीएसएमटी सिंहगड एक्सप्रेस
2) 12124 : पुणे-सीएसएमटी डेक्कन क्वीन एक्सप्रेस
3) 12110 : मनमाड-सीएसएमटी पंचवटी एक्सप्रेस
4) 12126 : पुणे-सीएसएमटी प्रगति एक्सप्रेस
5) 20705 : जालना- सीएसएमटी वंदेभारत एक्सप्रेस
6) 11012 : धुळे-सीएसएमटी एक्सप्रेस
7) 11008 : पुणे-सीएसएमटी डेक्कन एक्सप्रेस
8 ) 12128 : पुणे-सीएसएमटी इंटरसिटी एक्सप्रेस
9) 17618 : नांदेड-सीएसएमटी तपोवन एक्सप्रेस
10) 22226 : सोलापूर-सीएसएमटी वंदेभारत एक्सप्रेस
11) 22230 : मडगाव-सीएसएमटी वंदेभारत एक्सप्रेस
12) 22120 : मडगाव-सीएसएमटी तेजस एक्सप्रेस
13) 12702 : हैदराबाद-सीएसएमटी हुसैन सागर एक्सप्रेस
14) 17412 : कोल्हापूर-सीएसएमटी महालक्ष्मी एक्सप्रेस
15 ) 17611 : नांदेड-सीएसएमटी राज्यरानी एक्सप्रेस
1 जनू रोजी या डाऊन गाड्या रद्द
1) 17617 : सीएसएमटी- नांदेड तपोवन एक्सप्रेस
2) 22119 : सीएसएमटी- मडगाव तेजस एक्सप्रेस
3) 12127 : सीएसएमटी-पुणे प्रगति एक्सप्रेस
4) 11007 : सीएसएमटी-पुणे डेक्कन एक्सप्रेस
5 ) 11011 : सीएसएमटी-धुळे एक्सप्रेस
6) 20706 : सीएसएमटी-जालना वंदेभारत एक्सप्रेस
7) 22225 : सीएसएमटी-सोलापूर वंदेभारत एक्सप्रेस
8) 12125 : सीएसएमटी-पुणे प्रगती एक्सप्रेस
9) 12123 : सीएसएमटी-पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेस
10) 11009 : सीएसएमटी-पुणे सिंहगड एक्सप्रेस
11) 12109 : सीएसएमटी-मनमाड पंचवटी एक्सप्रेस
12) 17612 : सीएसएमटी-नांदेड राज्यराणी एक्सप्रेस
13) 12111 : सीएसएमटी-अमरावती एक्सप्रेस
14) 12289 : सीएसएमटी-नागपूर दुरांतो एक्सप्रेस
15) 17411 : सीएसएमटी-कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस
16) 12701 : सीएसएमटी-हैदराबाद हुसेन सागर एक्सप्रेस