Mumbai Corona Update : मुंबईतील रुग्णसंख्येत मोठी घट, केवळ 27 नव्या रुग्णांची नोंद
Mumbai Corona Update : मुंबईत मागील बऱ्याच काळातील सर्वात कमी रुग्णसंख्या आज आढळली असून नवे केवळ 27 कोरोनाबाधित आढळले असून 38 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

Mumbai Corona Update : मुंबईतील कोरोनारुग्णांची (Mumbai Corona Update) संख्येत आज मोठी घट पाहायला मिळाली. नवे केवळ 27 कोरोनाबाधित (Corona) आढळले असून मागील बऱ्याच काळातील ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. आज देखील एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला नसल्याने ही देखील एक दिलासादायक गोष्ट आहे.
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत नवे 27 कोरोनाबाधित आढळले असून 38 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत कमी आढळणाऱ्या रुग्णांमुळे कोरोना रुग्ण दुपटीचा दर 13601 दिवसांवर पोहोचला आहे. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या देखील कमी झाली असून आज ही संख्या 334 इतकी झाली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 98 टक्क्यांवर गेले आहे. आज नव्याने सापडलेल्या 27 रुग्णांपैकी 5 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 28 हजार 513 बेड्सपैकी केवळ 124 बेड वापरात आहेत.
देशातही रुग्णवाढीचा दर मंदावला
मुंबईसह इतर राज्यात रुग्ण कमी आढळत असल्याने देशातही कोरोना विषाणूचा संसर्गाचा वेग मंदावला आहे. तसंच मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे. देशात गेल्या 24 तासांत 2 हजार 503 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 27 जणांचा मृत्यू झाला आहे. काल देशात 3116 नवे रुग्ण आढळले होते तर, 47 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे तुलनेने आज रुग्णवाढ आणि मृत्यू कमी झाले आहेत. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 36 हजार 168 वर पोहोचली आहे.
हे ही वाचा -
- Coronavirus Cases Today : कोरोना संसर्गाचा वेग मंदावला, देशात गेल्या 24 तासांत 2503 नवे रुग्ण, 27 जणांचा मृत्यू
- Coronavirus Update : कोरोनाची चौथी लाट येणार का? पाहा तज्ज्ञ काय म्हणतात...
- Mumbai Local Train : मुंबईत लोकल प्रवासासाठी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस अनिवार्य
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
